संगमनेर Live | येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या प्रेम व बंधुत्व या मार्गाने सर्वानी चालणे गरजेचे असल्याचे मत जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यानी व्यक्त केले असून २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून जगभरात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नाताळ सणानिमित्त भेट देण्यासाठी आल्या असता उपस्थिताना मार्गदर्शन करताना सौ. विखे बोलत होत्या.
यावेळी जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिणीताई किशोर निघूते, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाण्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक दिलीप इंगळे, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके, संजय उंबरकर, भागवत उंबरकर, गोपीनाथ भुसाळ, रविंद्र शेळके, संजय शेळके, अनिल शेळके, अशोक शेळके, जगदीश शेळके, मार्कस शेळके, ग्रामपंचायत सदंस्य विजय शेळके, सामाजिक कार्यकर्ते अँड. रवी शेळके, गणेश भुसाळ, बापूसाहेब भुसाळ, संपत भुसाळ, सुरेश भुसाळ आदिसह नागरीक व महिला उपस्थित होत्या.
दरम्यान उंबरी येथील ख्रिस्तराजा चर्च प्रार्थनास्थळी रात्री भक्तांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी फादर सायमन शिनगारे यानी प्रभू येशूची आराधना करुन पवित्र संदेश वाचून दाखविला. यानतंर ख्रिस्त राजा तरुण मित्र मंडळाच्या वतीने उपस्थिताना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच ख्रिस्ती बांधवांच्या परसबागेत नाताळ सणानिमित्त गोठा बनवून घरोघरी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती.