संगमनेर Live | समाजाच्या न्याय हक्कासाठी एकलव्य संघटना वाढवणे गरजेचे असून संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वानी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजे. समाजातील लोकापर्यत शासकीय योजना पोहचवण्यासाठी संघटना काही कठोर निर्णय घेणार आहे. आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे पाऊल उचलावे लागणार असून शासनाची ‘ पाडा तेथे म्हाडा ’ हि घरकुल योजना आदिवासी बांधवांसाठी राबवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त म्हाडाचे सभापती नामदार शिवाजी ढवळे यानी केले आहे.
श्रीरामपूर येथिल शासकीय विश्राम गृह येथे नुकतीच एकलव्य संघटनेच्या राज्य युवाआघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत जातीचे दाखले, नवीन रेशनकार्ड, राहत्या घरच्या जागा नावावर नसणे आदिसह आदिवासी समाजाचे विविध प्रश्न व समस्यावर विचार मंथन करण्यात आले. याप्रसंगी ना. शिवाजी ढवळे यानी आदिवासी बांधवाना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्याच्या सुचना संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्याना दिल्या आहेत.
दरम्यान या बैठकीसाठी युवा जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, टायगर फोर्सचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सुरसे, भाऊराव पवार, कुंदन माळी, राहाता तालुका अध्यक्ष अनिल रोकडे, कृष्णा बर्डे, संगमनेर तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, राहूरी तालुकाध्यक्ष नानासाहेब बर्डे, नेवासा तालुकाध्यक्ष नाना बर्डे, राहूरी युवा तालुकाध्यक्ष विशाल बर्डे, नेवासा टायगर फोर्स तालुकाध्यक्ष संभाजीराव गायकवाड, तालुका संपर्क प्रमुख नंदू बर्डे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष मोरे, तालुका संघटक अशोकराव शिंदे, टायगर फोर्सचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मारुती बर्डे, युवा तालुकाध्यक्ष दिपक बर्डे, तालुका सचिव सर्जेराव आहेर,
श्रीरामपूर शहर अध्यक्ष फिरोजभाई शेख, लोणी शहर अध्यक्ष नामदेव पवार, सागर भालेराव, राहाता तालुका कार्याध्यक्ष विलास मोरे, अंकेश माळी, दिपक पवार ,अमोल रजपूत, आण्णा भालेराव, राजू लोखंडे, मारुती आहेर, सुखदेव मोरे, बबनराव आहेर, किरण आहेर, संजय गांगुर्डे, पप्पू गांगुर्डे, सतिश डोळस, संभा साळवे, योगेश आहेर, सुनिल गांगुर्डे, योगेश सोनवणे, आक्षय बर्डे, गोपिनाथ आहिरे, संजय मोरे, गणेश साळुंके, सुनिल पवार, हारीभाऊ पवार, योगेश बोरशे, विलास गोधडे आदीसह उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.