◻ आश्वी बुद्रुक येथे पद्मभुषन दिवगंत खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ क्रिकेट स्पर्धाचे आयोजन.
संगमनेर Live | जीवनात मैदानी खेळाना अनन्य साधारण महत्व असून खेळामुळे शरीर निरोगी व सुदृढ बनत असते. स्वर्गिय खासदार साहेबानी आयुष्यभर सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रासाठी भरभरुन योगदान दिले. ग्रामिण भागातील मुलाच्या क्रिडागुणाना वाव मिळाल्यास ते देशपातळीवर नेतृत्व केल्याची उदाहरणे अजिक्यं रहाणे व झहीर खान याच्या रुपाने आपल्या पुढे असल्याचे गौरोउदगार माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यानी काढले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे दिवगंत खासदार पद्मभुषन बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे मोरया क्रिकेट क्लबकडून आयोजन करण्यात आले या स्पर्धेच्या उध्दघाटन प्रसंगी सौ. विखे मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई किशोर निघुते, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, जेष्ठ नेते विनायकराव बालोटे, भगवानराव इलग, भाऊसाहेब जऱ्हाड, रामभाऊ भुसाळ, स्टेट बँक आँफ इंडियाचे शाखाधिकारी नानासाहेब डोईफोडे, भाजपचे सरचिटणीस अशोकराव जऱ्हाड, ज्ञानेश्वर वाकचौरे, हरिभाऊ ताजणे, नवनाथ ताजणे, मिलिदं बोरा, शांता ब्राम्हणे, शंकुतला गायकवाड, सुरेखा गायकवाड, गौरव सांबरे, गंगाराम गायकवाड, अनिल गायकवाड, वसंत गायकवाड, अशोक गायकवाड, सुनील गायकवाड, मंगेश गायकवाड, कुणाल शिदें आदिसह सार्थक ब्राम्हणे, वरद ब्राम्हणे, संकेत ब्राम्हणे, महेश इघे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी सौ. विखे यानी स्पर्धेच्या मैदानाची पहाणी करून मोरया क्रिकेट क्लब व अजय ब्राम्हणे कुटुंबाने अतिशय सुत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. दरम्यान या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी शंभर पेक्षा जास्त संघानी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोदंणी केली असून या स्पर्धेत तालुक्यासह बाहेरुन आलेले संघ हजेरी लावत आहेत. या क्रिकेट स्पर्धेसाठी जेष्ठ नेते भाऊसाहेब जऱ्हाड यानी मैदान उपलब्ध करुन दिल्याने मोठ्या उत्सहात याठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत.
दरम्यान ३० डिसेंबर रोजी पद्मभुषन दिवगंत खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनी भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्या हस्तें बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती आयोजकानी दिली असून यावेळी कुणाल ब्राम्हणे, विक्रांत वर्पे, कार्तिक गायकवाड, प्रमोद ताजणे, रोहित ताजणे, अमोल ताजणे, सोमनाथ गायकवाड, संकेत गायकवाड, जयकुमार गायकवाड, सुजित मंडलिक आदिसह खेळाडू व ग्रामस्थं उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन गायकवाड यानी तर आभार विजय व अरुण ब्राम्हणे यानी मानले आहेत.