◻ मुगंसाच्या तावडीतून नागाची सुटका करत सर्पमित्राने वाचवले नागाचे प्राण.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वीसह परिसरातील गावानमधील वर्दळीच्या ठिकाणासह मानवी वस्त्यामध्ये मागील दोन वर्षापासून बिबट्यासह नाग, मण्यार, घोणस या विषारी सर्पासह धामण व ईतर बिनविषारी सर्प मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे बिबट्या व साप दिसणे हे नागरीकाचे दिनक्रम होत चालले असताना जखमी नागाच्या जबड्यासह फण्यावर झालेल्या जखमेवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून संर्पमित्र शिवा पवार याने यशस्वी उपचार करत जीवनदान दिल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संर्पमित्र शिवा पवार याने जीवाची पर्वा न करता काही दिवसापूर्वी मुंगूस व नागाची लढाई सुरु असताना मुगंसाच्या तावडीतून नागाची सुटका केली होती. यावेळी या जखमी नागाचा जबडा तसेच फण्यातून रक्त येत असल्याने त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने शिवा पवार याने आश्वी खुर्द येथिल पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करत नागाला उपचारासाठी दवाखान्यात आणले होते.
यावेळी संर्पमित्र शिवा पवार याने नागाचा फणा अलगद धरुन ठेवल्यानतंर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. शिदें यानी डॉ. अनिल क्षिरसागर यांच्या मदतीने त्वरीत नागाची जखम धुवुन काढत त्यावर वैद्यकीय औषध उपचार केले. यानंतर या जखमी नागाला निसर्गात मुक्त करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षापासून आश्वीसह परिसरातील गावानमध्ये नाग, मण्यार, घोणस या विषारी सर्पासह धामण व ईतर बिनविषारी सर्प मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीवावर उदार होत आतापर्यत संर्पमित्र शिवा प्रसाद याने शेकडो सापाना जीवनदान देऊन निसर्गात मुक्त करत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून साप दिसल्यास त्याला न मारता मला फोन करावा आम्ही त्या सापाला सुरक्षित जगंलात सोडू असे आवाहन शिवा पवार याने केले आहे.