संगमनेर Live | सह्याद्री शिक्षण संस्थेतील शिक्षक निखिल जोर्वेकर यांची तीन वर्षाची कन्या अमायरा निखिल जोर्वेकर ही ७ भाषांमधून स्वतःचा परिचय करून देत असून तिच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर येथील रहिवासी निखिल जोर्वेकर यांची ३ वर्षे व ५ महिनेची मुलगी अमायरा ही स्वतःचा परिचय मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, गुजराती, पंजाबी व संस्कृत या भाषेतून अगदी सहजपणे करून देते. तिच्या या अनोख्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून तिला तिची आई सौ. पूनम निखिल जोर्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिच्या या विक्रमा बद्दल महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते राजहंस दूध संघ येथे सत्कार करण्यात आला. यावेळी वडील निखिल जोर्वेकर, आजोबा अरुण जोर्वेकर, आई पूनम जोर्वेकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या चिमुकलीच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत असून राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात, लक्ष्मणराव कुटे, रणजितसिंह देशमुख, सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे, सहसचिव दत्तात्रय चासकर, जयहिंद लोक चळवळीचे मिलिंद औटी, बंटी साळवे, तुषार गायकर आदींनी अभिनंदन केले आहे.