◻ आश्वी बुद्रुक, दाढ खुर्द व पिप्रीं लौकी येथे पोलीसाची कारवाई.
संगमनेर Live | वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस स्टेशनतंर्गत येणाऱ्या गावामधून विविध गुन्ह्यातील ९ आरोपीना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असताना यातील ३ हद्दपार आरोपी हे आपल्या राहत्या घरी आढळून आल्याने त्यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस नाईक विनोद गंभीरे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात तक्रांर दाखल केली असून शरद उर्फ गोट्या पर्वत (रा. दाढ खुर्द), शंकर उर्फ संकेत दातीर (रा. प्रिंप्री लौकी), मोहसीनखान पठाण (रा. अकोले नाका), रविंद्र इंगळे (रा. आश्वी बुद्रुक), सुखदेव वाडेकर (रा. आश्वा बुद्रुक), श्रीकांत उर्फ शिरक्या मुन्तोडे (रा. आश्वी बुद्रुक), प्रकाश वाडगे (रा. दाढ खुर्द), राहुल वाघ (रा. दाढ खुर्द), गणेश कोरडे (रा. आश्वी खुर्द) या सर्वाना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ नुसार १८ महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले मात्र हद्दपार कालावधी संपला नसताना सुद्धा रविद्र इंगळे, शरद उर्फ गोट्या पर्वत, शंकर उर्फ संकेत दातीर पोलिसाना गस्त घालत असताना आढळून आले होते.
त्यामुळे पोलिस नाईक विनोद गंभीरे, पो. हे. कॉ. वाकचौरे व पथवे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेवून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ च्या नियमाचे उल्लघंन केल्याने त्याना ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.