◻ नेवासे - श्रीरामपूर महामार्गावरील घटना. प्रतापपूर येथिल एका जणावर उपचार सुरु.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल मच्छिंद्र नाना नागरे (वय - ४५) यांचा नेवासे येथुन घराकडे येत असताना झालेल्या भिषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून सखाराम आंधळे गंभिर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मच्छिद्रं नागरे यांची नेवासे तालुक्यात शेती आहे. शेतीच्या कामानिमित्त ते व सखाराम आंधळे हे नेवासे येथे गेले होते. शुक्रवारी उशीरा शेतीचे कामे आटपुन ते आपल्या शिबलापूर येथिल घराकडे दुचाकीवरुन येत होते.
नेवासे - श्रीरामपूर रस्त्यावर एस कॉर्नर लगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अचानकपणे अज्ञात वाहणाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरीकाच्या मदतीने त्याना रुग्णालयात दाखल केले असता मच्छिद्रं नागरे यांचा उपचाराआधी मृत्यू झाला होता. तर सखाराम आंधळे (रा. प्रतापपूर) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान शनिवारी दुपारी शोकाकूल वातावरणात मच्छिद्रं नागरे याच्या पार्थिव देहावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहे. मच्छिद्रं नागरे याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, एक भाऊ व भावजय असा मोठा परिवार असून शिबलापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी नवनाथ नागरे यांचे ते बधुं होते. त्याच्या आकस्मात मृत्यूमुळे शिबलापूर व प्रतापपूर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.