◻ शिबलापूर, दाढ खुर्द, पिप्रीं व खळी शिवारातील घटना ; अर्थिक मदतीचे नागरीकाचे आवाहन.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या भिज पावसात गारठल्याने १७ मेंढ्या व २ शेळ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडल्यामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवसापासून आश्वी सह परिसरात भिज पावसामुळे स्थानिक नागरीकाचे जीवनमान विस्कळीत झाल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. सतधार पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थंडी वाढली आहे. त्याची झळ नागरीकासह शेतकऱ्याच्या जनावरे तसेच पशु पक्षानाही बसत आहे.
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील बाळू चिंधू तांबे हे मेंढ्या चारण्यासाठी म्हणून शिबलापूर परिसरात वास्तव्यास आहेत. बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे तांबे यांच्या ५ मेंढया दगावल्याने अंदाजे ५० हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे. शिबलापूर येथिल अमीन सलीम शेख यांच्या एका शेळीला गारव्याचा तडखा बसल्याने ८ हजार रुपये किंमतीची शेळी दगावली आहे.
तसेच दाढ खुर्द येथे मेढ्या चारण्यासाठी आलेल्या चद्रकांत हरिभाऊ कोळपे यांच्या ३ मेंढ्या व १ शेळीचे बकरु मृत्यूमुखी पडल्याने त्याचे ४५ हजाराचे नुकसान झाले. तर पिप्री येथे बाळासाहेब लहानु दातीर यांच्या ६ मेंढ्या व खळी येथे वाघू हिरु पोकळे याच्या ३ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्यामुळे मेढंपाळाचे लाखो रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान या घटनेची माहीती कळताचं गुरुवारी सकाळी शिबलापूरचे उपसंरपच दिलीप तबाजी मुन्तोडे, दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी, कामगार तलाठी आव्हाड, तलाठी मंगल सागळे, ग्रामसेवक चांडे, सुरेश ब्रोंद्रे, राजेद्र पाचरणे, कारभारी जोरी, भागवत जोरी, संदीप जोरी, लहानु साळवे, रमेश जोशी आदिनी त्या - त्या घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा करत शेतकऱ्याला धिर दिला असून मेंढपाळाचे मोठे अर्थिक नुकसान झाल्यामुळे शासनाने आर्थिक साहाय्य देण्याची मागणी परिसरातील नागरीकानी केली आहे.
संवेदनाहिन पशुवैद्यकीय अधिकार..
आश्वी खुर्द येथिल पशुवैद्यकीय आधिकाऱ्याला मेंढपाळासह स्थानिक नागरीकानी वारंवार संपर्क करुनही उपलब्ध झाले नाही. सकाळी ९ वाजेपासून मेंढपाळ दवाखान्यासमोर वाट पाहत बसून होते, मात्र तरीही डॉक्टर आले नाही. त्यामुळे आश्वी खुर्द येथिल सामाजिक कार्यकर्ते संतोष भडकवाड यानी फोनकरुन आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्या कार्यालयाला संवेदनाहिन डॉक्टरांची माहिती दिली. कार्यालयाकडून समज मिळताचं त्या डॉक्टरने घटनास्थळी जातो असे सांगितले मात्र ५ वाजेपर्यंत ते आले नसल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे त्या डॉक्टरचे नावही परिसरातील नागरीकाना माहित नसल्याची माहिती मिळाली आहे.