लेखन व सामाजिक कामासाठी पुरस्कार..
संगमनेर Live | नांदेड येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शामराव बोधनकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार यावर्षी हेरंब कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यापूर्वी पन्नालाल सुराणा, अशोक बेलखोडे यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याना हा पुरस्कार दिला आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या लेखनासाठी व सामाजिक कामासाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे.
वंचितांचे शिक्षणासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, दारिद्र्याची अभ्यास, बालविवाह, भटके विमुक्तांच्या प्रश्नावर सतत केलेले लेखन व अलीकडे कोरोना विधवांच्या प्रश्नावर ते काम करत आहेत.
दरम्यान या पुरस्काराचे वितरण १४ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते केले जाणार आहे अशी माहिती पुरस्कार समिती ने दिली.