◻ उद्योजक साई मांढरे यानी बिबट्या केला मोबाईल कैमेरात कैद.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत शनिवारी रात्री तरुण उद्योजक साई राजेद्रं मांढरे यांना एक पुर्ण वाढ झालेला बिबट्या नजरेस पडला असून त्यानी आपल्या मोबाईल मध्ये या बिबट्याचा विडीओ काढला आहे. तर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर बिनधास्त वाढल्यामुळे नागरीकानमध्ये भितीचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री बारा - साडेबारा वाजेच्या सुमारास येथिल तरुण उद्योजक साई राजेद्रं मांढरे हे आपल्या चार चाकी वाहणातून आश्वी खुर्द येथील आपल्या राहत्या घराकडे चालले होते.
यावेळी प्रवरा उजव्या कालव्या लगत असलेल्या तुषार संपतराव सोनवणे याच्या शेतात एक पुर्ण वाढ झालेल्या तीन ते साडेतीन फूट उंचीच्या बिबट्या शिकारीच्या शोधात येरझाऱ्या घालत होता. त्यामुळे साई माढंरे यांनी आपल्या वाहणाचा प्रकाश तिकडे वळवून आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचा विडिओ कैद केला आहे. यावेळी बिबट्या काही वेळानतंर आधारात गडप झाल्यानतंर साई मांढरे हे आपल्या घरी गेले.
दरम्यान बिबट्या नजरेस पडलेल्या ठिकाणापासून काही अतंरावर मोठी लोकवस्ती व वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे. तसेच काही दिवसापूर्वी याचं ठिकाणापासून काही अतंरावर अनेकदा लोकाच्या नजरेस हा बिबट्या पडत असतो.
त्यामुळे वारंवार हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने काही अघटित होण्याआधी हा बिबट्या वनविभागाने जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.