अनाथ मुलांच्या पालन पोषणासाठी त्यांचे योगदान चिरंतनकाळ स्मरणात राहील.
संगमनेर Live | जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथ मुलांची सावली गेली असल्याची प्रतिक्रीया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आव्हानात्मक परिस्थितीत समाजासाठी सेवाव्रती बनून अनाथ मुलांच्या पालन पोषणासाठी त्यांचे योगदान चिरंतनकाळ स्मरणात राहील असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण आयुष्यच सेवाव्रती राहीले. स्वत;च्या आयुष्यात आलेल्या.अनुभवांच्या तसेच दुखा:चा थोडाही लवलेश इतरांच्या आयुष्यात येवू न देण्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजातील अनाथ मुले आणि मुलींसाठी केलेले काम खुप मोलाचे ठरले.
त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये सदैव अनाथांसाठीचेच भाष्य होते. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातून अनाथ मुलांसाठीच सहकार्य आणि मदतीचे आव्हान त्या सातत्याने करीत राहीले. यातूनच या कार्याचा उभा राहीलेला डोंगर समाजाला एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला.
सिंधुताई सपकाळ यांना या कार्यामुळेच असंख्य पुरस्काराने गौरविले गेले. या अनमोल अशा कार्यामुळेच पद्मश्री पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान देवून केंद्र सरकारनेही त्यांच्या कार्याचा गौरव केला. अनाथांची माई या उपाधीने जनसामान्यांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेले स्थान मात्र अढळ असल्याची भावना व्यक्त करुन, आ. विखे पाटील यांनी त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.