◻ योगेश कुलथे व कुटुंबियाचा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद - इंदुरीकर महाराज
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल प्रथितयश सुवर्णकार योगेश कुलथे यानी वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्तें नुकतेच अनाथ आश्रमातील २५ मुलाना उबदार कपड्याचे वाटप करुन आपला वाढदिवस साजरा केला.
नुकताच अमृता ज्वेलर्सचे संचालक योगेश कुलथे यांनी वाढदिवसाचा शाल, श्रीफळ, संत्कार, केक यावरील अनावश्यक खर्च टाळून अनाथ आश्रमातील २५ बालकांना उबदार कपडे देऊन साजरा केला असून कुलथे कुटुंबाने राबवलेला नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरोउदगार निवृत्ती महाराज देशमुख यानी याप्रसंगी काढले आहेत.
यावेळी हभंप शालिनीताई देशमुख, सुभाषशेठ कुलथे, सरपंच पुंजाहरी शिदें, संपतराव शिंदे, अनिल महाराज वर्पे, नारायण थोरात, सौ. लताताई कुलथे, अमोल कुलथे, अनिल मुरलीधर वर्पे, गुळवे महाराज, रामभाऊ थोरात, विशाल कुलथे, अनुप कदम, सुजित क्षिरसागर, मंजित गायकवाड, पत्रकार रविंद्र बालोटे, संजय शेजुळ, सौ. सोनाली कुलथे, सौ. प्रियंका कुलथे, सागर कुलथे तसेच अनाथाश्रमातील मुले उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मितहास्य मला संत्कार व शाली या पेक्षा मोठे असल्याची भावना योगेश कुलथे यानी व्यक्त केली असून समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यानी योगेश कुलथे यांचे अभिष्टचितंन केले आहे.