संगमनेर Live | ‘ आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत अँड. शाळीग्राम होडगर याच्या मार्गदर्शनाखाली अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मांचीहिल यांच्या सहयोगाने संगमनेर तालुक्यातील प्रिंप्री लौकी- आजमपूर येथे सर्व रोग निदान शिबीर संपन्न झाले असून यावेळी १४८ रुग्णांची मोफत तपासणी करून आयुर्वेदिक व अँलोपॅथी औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
या शिबिराप्रसंगी सरपंच नंदाताई गिते, भारत गिते, भाऊसाहेब लावरे, भिकाजी गिते, दौलत दातीर, भारत सुखदेव गिते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड तसेच डॉ. निशांत इंगळे, डॉ. अविनाश जाधव, डॉ. कुलदीप राजपुत, विद्यार्थी व गावातील नागरीक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित रुग्णाना तात्काळ वेदना शमनाकरिता अग्निकर्म व विद्धकर्म करण्यात आले असून अँड. शाळीग्राम होडगर यांच्या प्रेरणेतून प्रत्येक महिन्यात परिसरातील एका गावात मोफत सर्व रोग निदान, मधुमेह तपासणी व औषध उपचार शिबीराचे आयोजन केले जात आहे. तसेच शिबिरानतंर परत त्या गावातील रुग्णाची वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. याप्रसंगी मोफत रुग्ण तपासणी व औषध उपचार करण्यात आले.
दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रिंप्री लौकी- आजमपूर व ग्रामस्थांनी सहकार्य केले असून रुग्णालयाचे संचालक दत्ता शिंदे, प्रशासकिय अधिकारी बाळाराम सांगळे, श्री. तांबे, श्री. वाणी, श्री. वाकचौरे, श्री. जाधव आदिसह रुग्णालयातील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.