संगमनेर Live | मागील अनेक निवडणुकामध्ये रिपाईच्या कार्यकर्त्याना मित्रपक्षाने विश्वासात न घेता केवळ आश्वासने देवून भूलवण्याचे प्रकार केले. परंतू आता परिस्थितीत बदल झाला असून ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई एकत्र होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मित्रपक्षाची वाट न बघता समाज्यातील सर्व घटकांना निवडणुकीची संधी देवून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन रिपाईचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेद्र थोरात यांनी केले असून लवकरचं सर्व समाज घटकाना बरोबर घेऊन आश्वी येथे पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याचे सांगितले आहे.
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे संगमनेर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या विचार मंथन बैठकीप्रसंगी सुरेद्रं थोरात बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनायक शेळके होते. रिपाई राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, पचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, जिल्हा कार्याध्यक्ष भिमा बागूल, जिल्हा युवाध्यक्ष पप्पू बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक खरात, तालुकाध्यक्ष आशिष शेळके, महीला तालुकाध्यक्ष रुपालीताई सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे, संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार,
एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, राहाता तालुकाध्यक्ष अनिल रोकडे, ख्रिश्चन संघटना अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, कार्याध्यक्ष उल्हासराव गायकवाड, अँड. रवि शेळके, शाखाध्यक्ष विजय शेळके, अनिल शेळके, अजय पाटोळे, राजाभाऊ मगर, रमेश भोसले, विजय खरात, विजय मुन्तोडे, विजय कदम, जनार्धन साळवे, संपत भोसले, सागर शिंदे, मेजर सुभाष ब्राह्मणे, अक्षय खरात, शहनाज बेगमपूरे, जॉन जगताप, अरविंद सांगळे, सुखदेव शेळके आदिसह राहाता व संगमनेर तालुक्यासह परिसरातून आलेले तरुण उपस्थित होते.
बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, ना. रामदास आठवले यांनी कधीही जात धर्म बघितला नाही. सर्व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. पक्षाच्या वाढीसाठी पायाला भिंगरी बाधल्यासारखे चालत राहिल्यामुळे राज्याच नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यात रिपाई संघटना उभी राहिली. आज तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रिपाईकडे आकर्षित झाला आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं तळागाळातील लोकांना प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण बाबासाहेबामुळेचं ‘ साहेब ’ आहोत हे विसरु नका असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी संरुनाथ उंबरकर, अशोक खरात, पप्पू बनसोडे, भिमा बागुल, संपत भोसले, प्रभाकर गायकवाड, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले तर सुत्रसंचालन अँड. रवी शेळके यांनी केले.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संग्राम शेळके, डॅनी गायकवाड, सौरभ शेळके, रोहिदास शेळके, सनी शेळके, हौशीराम शेळके, पप्पू शेळके, बाबासाहेब शेळके, सनी लोंढे, दादू शेळके, रोहीत शेळके, जयराम शेळके, सुशील शेळके, प्रतीक शेळके, पंकज शेळके, प्रमोद शेळके, सुनील शिखरे, शशी शेळके, रोहिदास शेळके, देविदास शेळके, अंतोनी शेळके, रॉकी गायकवाड, सागर शेळके, राहुल शेळके, विशाल शेळके, जॉन शेळके, प्रशांत शेळके, रामा पावडे, सुनील शिखरे, कैलास शेळके, ताराचद शेळके, अशोक भागवत शेळके, राहुल शेळके, विशाल शेळके, अशोक बर्डे, सुनील बर्डे, जालु बर्डे आदि तरुणांनी परिश्रम घेतले.