◻ प्रथम व द्वितीय क्रमाकाची पारितोषिके कुरणच्या संघाने पटकावली.
संगमनेर Live | पद्मभुषन मा. खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत कुरण येथिल गाझी संघाने प्रथम, समद संघाने द्वितीय, मोरया संघाने तृतीय व वाघापूर संघाने चौथ्या क्रमाचे बक्षीस पटकावले असून मोरया क्रिकेट क्लब कडून आयोजित प्लास्टिक बॉल स्पर्धा बक्षीस वितरणासह मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
यावेळी बक्षिस वितरण कार्यक्रमाठी जेष्ठ नेते अँड. शाळीग्राम होडगर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी नानासाहेब डोईफोडे, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई किशोर निघुते, माधवराव गायकवाड, विनायकराव बालोटे, भाऊसाहेब जऱ्हाड, अण्णासाहेब जऱ्हाड, हरिभाऊ ताजणे, नवनाथ ताजणे, मेजर सचिन रुपवते, शांताराम जोरी, जेऊरभाई शेख, सतिष जोशी, मिलिंद बोरा, ज्ञानेश्वर वाकचौरे, डॉ. संजय कहार, अशोक जऱ्हाड, सुरेश गायकवाड, कपिल बालोटे, विजय म्हसे, अशिष जाधव, जानकीराम गायकवाड, सुनिल गायकवाड, आनंद बालोटे, गौरव सांबरे, सनी उगले, गौतम गांधी, अजय ब्राम्हणे आदि उपस्थित होते.
दरम्यान या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सार्थक ब्राम्हणे, महेश इघे, स्वराज ब्राम्हणे, कार्तिक गायकवाड, गणेश वाघमारे, सौरभ लोढें, वरद ब्राम्हणे, संकेत गायकवाड, संकेत ब्राम्हणे, विक्रांत वर्पे, अरमान शेख, अनिल गायकवाड, एस. के. गायकवाड, अशोक गायकवाड, किरण गायकवाड, मंगेश गायकवाड, प्रतिक ब्राम्हणे आदिनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गजानन गायकवाड यानी तर आभार विजय ब्राम्हणे तसेच हरिभाऊ ताजणे यानी मानले.