संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील नामवंत अशा मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा अँड. शाळीग्राम होडगर, आश्वी बुद्रुकचे माजी सरपंच बाळकृष्ण होडगर व कै. चांगदेव होडगर याच्यां मातोश्री मथूराबाई ठकाजी होडगर (वय - १०६) यांचे रविवारी सायंकाळी ७.२३ वा. वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
त्याची निधनवार्ता सोशलमिडीयाच्या माध्यमातून आश्वीसह परिसरात माहिती होताचं सर्वत्र शोककळा पसरली असून समाज माध्यमातून त्याना श्रध्दांजली अर्पण केली जात आहे.
आश्वी परिसरात मथुराबाई होडगर या आदर्शमाता म्हणून परिचित होत्या. माजी सरपंच बाळकृष्ण होडगर व मांचीहिल संकुलाचे प्रमुख अँड. शाळीग्राम होडगर याच्या सारखे समाजसेवेचे व्रत घेतलेले रत्न त्यानी समाजाला देऊन गोर गरीब जनतेवर आईच्या मायेने प्रेम केले. त्यामुळे परिसरातील नागरीकानमध्ये त्याच्या विषयी आदर व अपार श्रध्दा आहे.
संगमनेर तालुक्यातील सहकारातील जेष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर याच्या मथुराबाई या सासू तसेच आश्वी बुद्रुकचे उपसरपंच राहुल जऱ्हाड याच्या त्या आजी होत्या. त्यामुळे आश्वीसह संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान त्याच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातंवडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी सकाळी कै. मथुराबाई होडगर याच्या पार्थिव देहावर आश्वी बुद्रुक येथिल प्रवरातीरी अत्यसंस्कार केले जाणार आहेत.