◻ नववर्षाच्या पुर्वसंध्येला पानोडी शिवारात बिबट्याचा धूमाकूळ.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारातील कदम वस्तीवर येथिल काही तरुण ३१ डिसेबर रोजी नविन वर्षाच्या स्वागताकरिता घराबाहेर शेकोटी करुन शेकत होते. यावेळी ११ वाजेच्या सुमारास आचानक बिबट्याची डरकाळी ऐकून या तरुणानाची चागलीच धादंल उडाली व त्यानी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला, मात्र यावेळी कोबंड्या व कुत्र्यावर बिबट्याने ताव मारुन ३१ डिसेंबरची पार्टी साजरी केल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरीत या बिबट्याचा बदोबस्त करावा अशी मागणी नागरीकानी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी ३१ डिसेबर रोजी नव वर्षाच्या स्वागतासाठी अरुण कदम, सिद्धार्थ अमोलिक, अंन्तोन कदम, सचिन कदम आदि तरुण शेकोटी करुन शेकत होते. यावेळी अरुण कदमच्या दिशेने बिबट्याने चालून येत डरकाळी फोडली त्यामुळे तेथिल सर्वाची भितीने गाळण झाली. पण यातून सर्वानी सावध होत सुरक्षित स्थळी पलायन केले. याप्रसंगी बिबट्याने अन्तोन कदम यांचा कुत्रा ठार करत सिद्धार्थ अमोलिक यांच्या कोबंडया घेऊन झुडपात पलायन केले होते.
मागील दीड महीन्यापुर्वी शिकारीच्या शोधात एक बिबट्या रावसाहेब तळेकर या शेतकऱ्यांच्या विहीरीत पडला होता. त्यानंतर मोठ्या कसरतीनंतर बिबट्याला विहीरीतून बाहेर काढत त्याची रवानगी इतरत्र करण्यात आली होती. मागील वर्षी चागला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र निर्माण झाल्याने आता पुन्हा परिसरात बिबटे आढळून येत आहेत. लपन क्षेत्र वाढल्याने पानोडी व परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे चारही दिशाना या बिबट्यांनी मोठी दहशत निर्माण झाली असून ऊस तोडणीचा हंगाम सुरु असल्याने बिबटे आपले बस्तान दुसरीकडे हलवत आहे. भुक शमवण्यासाठी शिकारीच्या शोधात हे बिबट्या शेतकऱ्याच्या पशुधनासह कुत्र्यावर हल्ले करत असल्याने वाड्या वस्त्यावर कुत्रे नामशेष होताना दिसत आहे.
दरम्यान पानोडी येथिल कदम वस्तीवरील नागरीकाचे पशुधन हे उघड्यावर असल्याने बिबट्याला सुलभपणे शिकार मिळवू लागल्या आहेत. त्यामुळे गरिब पशुपालकाचे मोठे अर्थिक नुकसान होत असून मानव जीवीतास मोठा धोका निर्माण झाल्याने हा बिबट्या जेरबंद करण्याची मागणी येथिल नागरीकानी केली आहे.