◻ आश्वी येथिल शिवसैनिक बाबासाहेब शिदेंसह कुटुंबाची केली आस्थेवाईकपणे चौकशी.
संगमनेर Live | अनेक पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळतोच असे नाही. बऱ्याचदा नवख्या आणि पब्लिसिटी बहाद्दर चमकोगिरी करणाऱ्या काही लोकांमुळं पक्षश्रेष्ठींसह स्थानिक आमदार व खासदार याना निष्ठावंतांचा विसर पडतो. मात्र संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल शिवसेनेचे गण व शाखा प्रमुख असलेले बाबासाहेब पोपट शिदें या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यानी भेट देऊन सुखद धक्का दिल्याने दोन दिवसापासून खा. लोखंडे हे दौऱ्यात निष्ठावंत शिवसैनिकाला विसरले नसल्याची परिसरात चर्चा सुरु आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की १ जानेवारी रोजी खा. सदाशिव लोखंडे हे एका कार्यक्रमानिमित्त आश्वी परिसरात दौऱ्यावर आले होते. दौऱ्यावर असतांना त्यांना शिवसैनिक बाबासाहेब शिदें यानी फोन करुन घरी चहा पाणी घेण्यासाठी निमंत्रित केले. आपला नियोजित कार्यक्रम आटोपून खा. सदाशिव लोखंडे यानी आपला ताफा थेट निष्टावंत शिवसैनिक बाबासाहेब शिदें याच्या घराकडे वळवला होता. यावेळी शिदें कुटुंबातील सर्वानी खा. लोखंडे यांचे उत्सहात स्वागत केले. खा. लोखंडे यानी अतिशय आपुलकीने शिदें कुटुंबाची विचारपूस करून तब्बल तासभर त्याच्याशी संवाद साधला. याप्रसंगी पोपट बाबूराव शिदें, सौ. सुशिला पोपट शिदें, सौ. जयश्री बाबासाहेब शिदें, कु. श्रध्दा व चि. कृष्णा शिदें, कैलास बिहाणी, चद्रंकात शिदें, मनोज अंजनकर, खा. लोखंडे यांचे स्विय साहय्यक शिवाजी दिशागत तसेच परिसरातील निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी खा. लोखंडे यानी उपस्थिताशी संवाद साधताना परिसरातील नव्या जुन्या सर्व शिवसैनिकाना बरोबर घेणार असल्याची ग्वाही दिली. वयाच्या सतराव्या वर्षी बाबासाहेब शिदें शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिदें हे एक कट्टर शिवसैनिक म्हणून तयार झाले. शिवसेनेनं केलेल्या प्रत्येक आदोंलनात त्याचा संक्रीय सहभाग असल्याने शिवसैनिकासह जनमानसात आदराचे स्थान मिळाले. त्यामुळे बाबासाहेब शिदें याना भविष्यात पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत भेटीदरम्यान खा. लोखंडे यानी दिले असून लवकरचं परिसरात शिवसैनिकाचा मेळावा घेणार असल्याचे सुतोवाचन केले आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्याना डावललं जात असल्याची तक्रार काही कार्यकर्ते खाजगीत करत असतात. मात्र स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रति असलेल्या निष्ठेमुळं ते ‘नव्यांच्या’ चमकोगिरीचा जास्त ताण घेत नाहीत. ते आपापल्या पद्धतीनं संघटनेचं काम करत राहतात. आता खा. लोखंडे यानी बाबासाहेब शिदें यांची भेट घेतल्यामुळं आश्वी परिसरातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र नवी उर्जा मिळालीय हे मात्र नक्की.
खा. लोखंडे या उमद्या नेत्याच्या भेटीनंतर “ मनासारखा नेता, नेत्या सारखं मन.. ” अशा शब्दात सुतीसुमने उधळत सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची व प्रसंगी अडचणीची जाणीव ठेवून पाठीशी उभे राहून बळ देणारे नेते लाभण हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असून खासदार साहेब हे माझ्या घरी आल्यामुळे मी व माझे सहकारी करत असलेल्या कामाला शाबासकी मिळाल्याची भावना आम्हा शिवसैनिकामध्ये निर्माण झाल्याने आमच्यामध्ये नवी उर्जा संचारली असल्याची भावना शिवसैनिक बाबासाहेब शिदें यानी व्यक्त केली आहे.