संगमनेर Live | लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब एकनाथराव विखे पाटील यांची ५ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी स्कुल कमिटीचे अध्यक्ष आण्णासाहेब भोसले होते. याप्रसंगी उपस्थिताच्या हस्ते प्रथम पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील व सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
“ पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या वडिलांच्या बरोबरीने सहकार व शैक्षणिक क्षेत्रात काम करुन गोर गरीब जनतेच्या मुलांना ग्रामीण भागात शिक्षणासाठी सुवीधा निर्माण केल्या, आज आपण त्यांच्यामुळे शिक्षण घेत आहोत, या पुण्यस्मरण सप्ताह निमित्ताने विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी वकृत्व व खेळाच्या स्पर्धेत भाग घेउन बक्षीस मिळविले त्यांचे अभिनंदन करतो ” असे प्रतिपादन प्राचार्य एस. टी. शेळके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब भोसले यांनी माजी खासदार डॉ. विखे साहेबांच्या आठवणी सांगितल्या व त्यांना विनम्र अभिवादन केले. सार्थक गायकवाड व कु. सायली कदम या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन डॉ. विखे यांना विनम्र अभिवादन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
दरम्यान यावेळी बाळासाहेब मांढरे, पद्मश्री डॉ. विखे कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, सरपंच म्हाळु गायकवाड, माजी मुख्याध्यापक प्रदीप वाल्हेकर, उप मुख्याध्यापक डॉ. बाळासाहेब आंधळे, पर्यवेक्षिका सौ. माधुरी सातपुते, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख मुस्ताक शेख, सांस्कृतीक विभाग प्रमुख सुनील आहेर आदि मान्यवर ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निचळ व ज्ञानेश्वर खर्डे यानी केले तर आभार सुभाष घोलप यानी मानले.