◻ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
◻ कोल्हार येथे झालेल्या कारवाईत संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
संगमनेर Live | गावठी कट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने कोल्हार (ता. राहाता) येथे आलेल्या संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेने सापाळा लाऊन जेरबंद करत त्याच्याकडून ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगनाऱ्या विरुद्ध कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधिक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
अहमदनगर जिल्हयातील अवैधरित्या गावठी कट्टे बाळगणाऱ्याची माहिती घेत असतांना दि. १४ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खात्रीशीर गोपनिय माहिती मिळाली की, कोल्हार (ता. राहता) शिवारातील अहमदनगर - मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ दोघे जण देशी बनावटीचे गावठी कट्टे व काही जिवंत काडतुस विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकाँ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरुंद, संदिप घोडके, विश्वास बेरड, पोना ज्ञानेश्वर शिंदे, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, पोकाँ सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, चापोहेकॉ संभाजी कोतकर याना तात्काळ कारवाईच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोल्हार शिवारातील हॉटेल जनता जवळ सापळा लावला. यावेळी दोघे जण जनता हॉटेलकडे पायी येत झाडाचे कडेला संशईतरित्या उभे राहिले. त्यामुळे पोलीसांनी दोघानाही नाव गाव विचारले असता ते उडवा - उडवीची उत्तरे देऊ लागले व पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना पथकाने शिताफिने ताब्यात घेतले. यावेळी पोलिसानी कसून चौकशी केली असता ऋषीकेश बाळासाहेब घारे, (वय - २१, रा. पारेगाव बु।, ता. संगमनेर) व समाधान बाळासाहेब सांगळे (वय - २७, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) असल्याची माहिती त्यानी दिली.
यावेळी पोलीसानी पंचासमक्ष याची अंगझडती घेतली असता ऋषीकेश घारे याचे कंबरेला १ देशी बनावटीचे गावठी पिस्टल मिळुन आले. तसेच समाधान बाळासाहेब सांगळे यांचे पाठीवर असलेल्या काळे रंगाचे पिशवीमध्ये ५ देशी बनावटीचे गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व १२ जिवत काडतुस मिळुन आले. या दोघाकडून एकुण ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतुस असा एकुण १ लाख ८६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ मनोहर सिताराम गोसावी यानी लोणी पोलीस ठाण्यात गुरनं. ६०/२०२२ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल व आरोपी लोणी पोलीस स्टेशनला हजर केले आहेत. तर पुढील कारवाई लोणी पोलीस स्टेशन करीत आहेत.
अहमदनगर जिल्हयामध्ये बेकायदेशिरपणे गावठी कट्टे बाळगणाऱ्या इसमांची माहिती पोलीस प्रशासनास दयावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.