◻ संघर्षमय जीवनातील शिक्षक सातपुते यांची वाटचाल प्रेरणादायी - पोलीस निरीक्षक सुभाष भोये
◻ उद्योजिका सुनिताताई कोडे यांनी मांढरे वस्ती शाळा घेतली १ वर्षासाठी दत्तक
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील मनोहर बाबा विद्यालयाचे उप मुख्याध्यापक तसेच उपक्रमशील आदर्श शिक्षक संदीप भानुदास सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल माढंरे वस्तीवरील जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्याना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
मंगळवरी सकाळी ११.३० वाजता आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत मानवता प्रतिष्ठान व जनसंवाद चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्याना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुभाष भोये यानी शिक्षक सातपुते याच्यां वाढदिवसनिमित्त राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत संघर्षमय जीवनातील शिक्षक सातपुते यांची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे म्हणताना आपल्या शालेय जीवणातील आठवणीना उजाळा देत जिल्हापरिषद शाळेचे महत्व स्पष्ट केले.
उद्योजिका सुनिताताई कोडे यांनी जिल्हापरिषद शाळा व इंग्रजी माध्यमातील शाळेचा फरक समजावून सांगताना मांढरे वस्तीची शाळा १ वर्षासाठी दत्तक घेणार असल्याची घोषणा केली. यावेळी इंजिनियर हरिश्चंद्र चकोर, कांचनताई माढंरे, जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे आदिनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, परफेक्ट फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सुनिताताई कोडे, माजी जिल्हापरिषद सदंस्या कांचनताई मांढरे, मानवता प्रतिष्ठानचे सदस्य इंजिनियर हरिश्चंद्र चकोर, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे, जेष्ठ पत्रकार व आश्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष सीताराम चांडे, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार योगेश रातडीया, संगमनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकीलभाई शेख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे संगमनेर तालुका अध्यक्ष सोमनाथ काळे,
जनसंवाद चॅनलचे संपादक दत्तात्रय घोलप, संतोष भडकवाड, संदीप सोनवणे, पोलीस नाईक विनोद गभिरें, शांताराम झोडंगे, पवार, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास कदम, राजेश गायकवाड, रामेश्वर शिंदे, पत्रकार अनिल शेळके, निलेश सातपुते, कुणाल डूबे, सावकार लावरे, कांताभाऊ सोनवणे, दत्तात्रय मांढरे, रमेश कदम, अनिल लावरे, संपत बर्डे, सौरभ शिंदे, संपत शिंदे, मिनीनाथ औताडे, मांढरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आश्वी खुर्दचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, बाळकृष्ण भालेराव, शिक्षिका वैशाली गावडे आदिंसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दरम्यान चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील आनंद ही माझ्या वाढदिवसाची गोड भेट असल्याचे शिक्षक संदीप सातपुते यानी म्हटले असून या कार्यक्रमाचे सुदंर असे सूत्रसंचालन रुपाली गोडगे यांनी तर वैशाली गावडे यांनी आभार मानले आहेत.