◻ माझाही झालेला सन्मान हा संस्कारांचा सन्मान - आ. विखे पाटील
◻ ‘ जीवन साधना गौरव पुरस्कार ’ मिळाल्याबद्दल आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी संत्कार
संगमनेर Live (लोणी) | सरपंच, उपसरपंचांना चहाच्या दूकानाला नाव दिलेले सहन झाले नाही, मग राष्ट्रपुरुष आणि संताच्या नावाच्या पाट्या तुम्ही सहन कशा करता.? असा परखड सवाल समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी केला. यापुढे कोणत्याही दूकानांवर राष्ट्रपुरुष आणि संतांची नावे न लावण्याचा संकल्प शिवजयंतीच्या निमित्ताने करण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले.
लोणी बुद्रूक येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सप्ताहाचे उद्घाटन निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वखाली एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम राबविला जात असून यंदाचे हे ३७ वे वर्ष आहे. उत्सव समितीच्या वतीने जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सरपंच श्रीमती कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, एम. वाय विखे, भागवत विखे, आण्णासाहेब म्हस्के, अशोकराव धावणे, माजी सरपंच लक्ष्मण विखे, माजी उपसरपंच अनिल विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब साबळे, अॅड. नितीन विखे, नंदू राठी, चंद्रकांत म्हस्के, विजय लगड, सोसायटीचे चेअरमन सी. एम. विखे, किशोर धावणे, राहुल धावणे, भाऊसाहेब विखे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच आणि उपसरपंच यांच्या नावाने चहाची दुकान टाकली गेली पण हा आमच्या पदाचा अपमान आहे असे सांगून त्यांनी ही नावे देण्यास विरोध केला. अडीच वर्षे पदावर राहणाऱ्या व्यक्तिंना हे सहन होत नाही, तर वर्षानुवर्षांचा इतिहास असलेल्या राष्ट्रपुरुषांचा, संतांचा अपमान दुकानांवर पाट्या लावून होत नाही का.? असा सवालही त्यानी उपस्थित केला. आपल्या प्रबोधनातून निवृत्ती महाराज देशमुख यांनी संत साहीत्याचा संदर्भ घेवून समाजाने जागृत होण्याची गरज व्यक्त केली. आपल्याच राष्ट्र पुरुषांची किंवा संतांची होत असलेली अवहेलना आपण थांबवु शकलो नाही तर धर्म टिकणार कसा आस प्रश्न करुन निवृत्ती महाराज म्हणाले की, कोणतेहा व्यवसाय राष्ट्रपुरुष आणि संतांच्या नावाने सरु होतात.
संताचा विचार वारकरी संप्रदायाने जपला, म्हणून आज धर्म टिकून आहे. राष्ट्रपुरुषांनी रक्त ओकले म्हणून स्वातंत्र्य आणि स्वराज्य मिळाले हे आपण विसरलोच कसे.? त्यांच्या स्मृती विचाराने आणि कृतीने जागृत ठेवण्याची आवश्यकता असताना आता संत आणि राष्ट्रपुरुष समाजात फक्त नाव देण्यापुरतेच राहीले आहेत हे अभिप्रेत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवजयंतींचा उत्सव फक्त गर्दी जमविण्यासाठी नाही तर विचारांचे मंथन करण्यासाठी झाले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सलग ३७ वर्षे एक गाव एक शिवजयंती हा उत्सव लोणी बुद्रूक ग्रामस्थांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु ठेवल्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या उत्सवाने एक आदर्श निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.
विखे पाटील परिवाराने सर्व समाज घटकांना एकत्रित ठेवून आजपर्यंत वाटचाल केली. सहकाराचा मंत्र येथील मातीत रुजविला. शिक्षणाची पायाभरणी करुन, असंख्य पिढ्यांचे भविष्य घडविण्याचे मोठे काम केले. समाजाप्रती असलेली संवेदनाच आ. विखे पाटील यांनी पुरस्कारापर्यंत घेवून गेली असे गौरवौद्गार त्यांनी सत्काराप्रसंगी काढले.
आपल्या संत्काराला उत्तर देताना आ. विखे पाटील म्हणाले की, जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे प्रवरा परिवाराचाही सन्मान झाला आहे. या पुरस्काराने तिर्थरुप मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांनाही पुणे विद्यापीठाने गौरविले होते. आता त्याच पुरस्काराने माझाही झालेला सन्मान हा संस्कारांचा सन्मान असल्याचे त्यांनी नमुद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच अनिल विखे यांनी केले तर आभार माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मानले.