संगमनेर Live | ग्रामीण भागातील उपेक्षित, अल्पभुधारक, अर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील मुला मुलीना शिक्षण मिळाले तर ग्रामीण भागाच्या विकासाला चालणा मिळून राष्ट्र प्रगतीपथावर जाईल या दृष्टिकोणातून पद्मभुषण खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यानी सन १९६४ साली संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यालयाची उभारणी केली होती.
२००१ साली संस्थेने याठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय सुरु केले. याचं महाविद्यालयाच्या मुल्याकनासाठी तीन सदंस्यीय नॅक समितीचे पथक ते ४ फेब्रुवारी दरम्यान येणार असल्याने महाविद्यालय यासाठी सज्ज असल्याची माहिती महाविद्यालयाने दिली.
संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची पूर्ण तयारी झालेली असून महाविद्यालयाला दर पाच वर्षांनी नॅक तर्फे मूल्यांकन करत असते. नॅक मुल्यांकनामध्ये जास्त श्रेणी मिळतील तेवढे ते महाविद्यालय उच्च प्रतीचे मानले जाते. त्यामुळे शासनाकडून विकासासाठी जास्तीचा निधी उपलब्ध होत असतो. यादृष्टीने नॅक हे महाविद्यालयासाठी खूप महत्त्वाची बाब असल्याने मागील काही वर्षामध्ये महाविद्यालयाने केलेल्या विकासात्मक बाबीचा लेखाजोखा यामध्ये माडला जाईल.
याबाबतची पूर्वतयारी म्हणून महाविद्यालयात अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली. त्या - त्या समिती सदस्यांना त्यांची जबाबदारी ठरवून दिलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर स्वतः भेटी देऊन महाविद्यालयाच्या नॅक दृष्टीने आढावा घेत आहेत. नॅक पिअर टीम महाविद्यालयास भेट देऊन संशोधन, मूलभूत सुविधा, फॅक्लटी इत्यादी बाबतीत पाहणी करणार आहे.
महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर तसेच प्राचार्य व नॅक समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे झालेली आहेत. त्यामुळे महाविद्यालयाला निश्चितच चांगली श्रेणी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी हे नॅकच्या तयारीसाठी अथक परिश्रम घेत आहेत.