◻ ना. बाळासाहेब थोरातासह जिल्ह्यातील मान्यंवराकडून खेमनर कुटुंबियाचे सात्वंन.
◻ बुधवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. प्रवरातिरी दशक्रिया विधी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गं. भा. तान्हाबाई सखाराम खेमनर (वय -१०५) याचे नुकतेचं वृध्दापकाळाने निधन झाले असून त्याच्या पश्चात दोन मुले, चार मुली व नातंवडे असा मोठा परिवार आहे.
मातोश्री तान्हाबाई यानी कुटुंबातील सर्वाना चागले संस्कार, शिक्षण देताना चांगलं राहायला, बोलायला नि ऐकायला शिकवलं, पायाला घाण लागू नये म्हणून आपण जसं जपतो, तसचं मनाला घाण लागू नये म्हणून जपत जा ! असे संस्कार मातोश्री तान्हाबाई यानी आपल्या मुला - मुलीवर केले.
क्षमाशील वृत्तीने आमचे अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी आमच्यावर मायेचा पदर पांघरून आम्हाला कुशीत घेणाऱ्या आईच्या निधनाने जणू काही आमच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव निघून गेला आहे. अशी भावना खेमनर कुटुंबियानकडून त्याच्या निधनानंतर व्यक्त होत आहे.
मातोश्री तान्हाबाई याना संगमनेर शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर, प्रगतशील शेतकरी किसन खेमनर ही दोन मुले व भिमाबाई रावसाहेब वडितके, सुमन सखाराम (बापू) खेमनर, चंद्रकला म्हतारबा भगत, शकुंतला तुकाराम होडगर, लिला लक्ष्मण भगत या चार मुली आहेत. हौशाबापू भाऊसाहेब खेमनर, शंशिकात भाऊसाहेब खेमनर, सुरज किसन खेमनर हे नातु असून अर्चना विकास बढे, योगिता संदीप होडगर व अपर्णा वैभव शिदें या मातोश्री तान्हाबाईच्या नाती आहेत.
दरम्यान बुधवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. उंबरी बाळापूर येथिल प्रवरातिरी मातोश्री तान्हाबाई यांचा दशक्रिया विधी शासकीय नियमाचे पालण करत विधिवत पार पडणार असून यावेळी हभंप कान्होपात्रा सुर्यवंशी यांचे प्रवचन होणार आहे.
खेमनर कुटुंबातील व्यक्तीचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाऊसाहेब खेमनर हे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मातोश्री तान्हाबाई याच्या निधनाची माहिती मिळताचं ना. बाळासाहेब थोरात, नाशिक पदविधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, युवक कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे आदिनी शोकभावना व्यक्त करत खेमनर कुटुंबियाचे सात्वंन केले आहे.