◻ आ. विखे पाटील विरुद्ध ना. थोरात गटात होणार सत्तेसाठी अटीतटीची लढत
◻ १३ जागासाठी ४३ उमेदवार रिगंणात ; अपक्षाचा एक अर्ज दाखल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ११० वर्ष जुन्या ऐतिहासिक अशा स्वातंत्र्य पुर्व काळातील सेवा सहकारी सोसायटीची पहिल्यादाच पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली असून १३ जागासाठी ४५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ अर्ज बाद झाल्याने ४३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व कॉग्रेसचे जेष्ठ नेते महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात याच्या गटात सत्तास्थापनेसाठी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने गावात निवडणूकीचे वातावरण तापू लागले आहे.
आश्वी खुर्द सेवा सोसायटीला ऐतिहासिक महत्व असून मागील ११० वर्षात येथे एकदाही निवडणूक झालेली नाही. यावेळी मात्र आ. विखे पाटील व ना. थोरात याचे कार्यकर्ते एकमेकाविरुद्ध उभे ठाकल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील ८ जागेसाठी आ. विखे गटाकडून भोसले विजय माधवराव, गायकवाड मोहित गंगाधर, गायकवाड सुरेश बाबुराव, गायकवाड विठ्ठल बजाबा (दोन अर्ज), मांढरे राजेद्रं प्रभाकर, खर्डे ज्ञानेश्वर प्रभाकर, शिदें भाऊसाहेब संपत, भवर निलेश बाळासाहेब, सोनवणे चंद्रकांत त्रिबंक, कोडोंलिकर प्रशांत निळकंठ, सोनवणे रमेश शिवाजी, भवर स्नेहलकुमार विजय, गायकवाड दिनकर गणपत
तर ना. थोरात गटाकडून मांढरे दत्तात्रय किसन, गायकवाड पांडुरंग भागाजी, गायकवाड रमेश विठ्ठल, सोनवणे भाऊसाहेब बाबुराव, भोसले संजय गबाजी, भवर बापूसाहेब माधव, गायकवाड अमोल प्रमोद, गायकवाड विठ्ठल मारुतराव, डुबे कुणाल दिलिप, गायकवाड विठ्ठल त्रिबंक, गायकवाड बाळासाहेब कुंडलिक, शिदें संपत भिमाजी तसेच गायकवाड विकास साहेबराव यानी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सर्वसाधारण गटातून २६ जण रिगंणात उतरले आहेत.
महिला राखीव प्रवर्गातून दोन जागासाठी आ. विखे गटाकडून गायकवाड शोभाताई बाळासाहेब, गडकरी रुपाली शैलेश, गायकवाड दिशा दत्तात्रय, गायकवाड सुरेखा प्रकाश तर ना. थोरात गटाकडून गायकवाड सुनिता रमेश, सैय्यद खतीनाबी छन्नुभाई, गायकवाड मंगलबाई अशा ७ जणीनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी आ. विखे गटाकडून मुन्तोडे जगदीश अंन्तोन, मुन्तोडे राजेद्रं अंन्तोन, मुन्तोडे यकोब चंदू तर ना. थोरात गटाकडून बर्डे पांडुरंग आप्पा हा एकमेव व एकून ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी आ. विखे गटाकडून गायकवाड दत्तात्रय बापूसाहेब तर ना. थोरात गटाकडून भोसले संजय गबाजी असे दोन अर्ज दाखल झाले असून भ. जा. वि. ज प्रवर्गातील एका जागेसाठी आ. विखे गटाकडून वाल्हेकर भास्कंर पांडुरंग, वाल्हेकर प्रदिप नामदेव तर ना. थोरात गटाकडून वाल्हेकर मयुर गणपत यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान ११० वर्षानतंर पहिल्यादाच निवडणूक होऊ घातली असल्याने गावातील राजकीय वातावरण चागलेचं तापले असून माघारीच्या दिवशी (दि. १८ फेब्रुवारी) चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक....
आश्वी खुर्द सेवा सोसायटीची मोठ्या प्रमाणात इमारत जागा असूनही त्या जागेचा व्यावसायिक वापर न झाल्याने गावातील अनेक सुशिक्षित तरुणाना बेरोजगार रहावे लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रेशनचे धान्य सेवा सोसायट्याच्या माध्यमातून वितरीत केले जाते. मात्र आश्वी खुर्द सेवा सोसायटीला परवडत नसल्याने धान्य दुकान खाजगी व्यक्तीला चालवायला दिले गेले तर सभासद सख्येत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न न केल्यामुळे सभासदानमध्ये नाराजीचा सुर असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.