◻ नॅककडून झालेल्या मूल्याकनात B++ मानांकन प्राप्त.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात नुकतीच नॅक समितीने मुल्यांकनासाठी भेट दिली होती. त्यामुळे महाविद्यालय राज्यातील उच्च श्रेणी विनानुदानित महाविद्यालयापैकी एक ठरले आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) कडून “B++” श्रेणी देण्यात आलेली असून ३ व ४ फेब्रुवारी रोजी समितीने महाविद्यालयाची तपासणी केली होती. नॅक ही भारतातील महाविद्यालयांचे मुल्यांकन करून व शैक्षणिक कामकाजाच्या दर्जाचे निरीक्षण करून गुणवत्तेचे प्रमाण ठरविणारी संस्था आहे. यावेळी महाविद्यालयाची तपासणी करून उपलब्ध शैक्षणिक, पायाभुत सुविधा, विद्यार्थी, पालकांचे अभिप्राय व इतर बाबींची सखोल परिक्षण केले आणि त्यानुसार महाविद्यालयास २.८९ CGPA गुण घेऊन “B++” श्रेणी प्रदान केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील तसेच महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी आण्णासाहेब भोसले, रामभाऊ भुसाळ, बाळासाहेब मांढरे, अँड. सौ. रोहिणीताई किशोर निघुते, भारत घोगरे आदींनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले आहे.
दरम्यान संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, उच्च व अतांत्रिक महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिर्डी साई रुरलचे संचालक डॉ. महेश खर्डे यांचे मार्गदर्शन लाभले असून महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, नॅक समन्वयक प्रा. अमित शिंदे त्याचबरोबर सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. नॅक मानांकन प्राप्त झाल्याने महाविद्यालयातील सर्वच घटक आनंद व्यक्त करत आहे.