संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात सोमवारी सांयकाळी शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नसीर युसुफ पठाण या ३६ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा तरुण या हल्ल्यात थोडक्यात बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नसीर पठाण हा तरुण सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रतापपूरहून दाढच्या दिशाने आपल्या दुचाकीवरुन चालला होता. यावेळी असलेल्या मंदिरालगत असलेल्या झुडपामध्ये शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नसीर पठाण याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो तरुण दुचाकीवरुन खाली कोसळला असता बिबट्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत करुन पुढे येण्याचा प्रयत्न केला असता नसीर पठाण याने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरुन झुडपात निघून गेला.
यावेळी घाबरलेल्या नसीर याने स्वता:ला सावरत निमगावजाळी आरोग्य केद्रांत जाऊन घडलेली हकीकत सांगतली. यानतंर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन नगर येथिल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान नसीर याची तब्येत आता बरी असून नेहमीचं या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने हा बिबट्या जेरबंद करुन नागरीकाची दहशतीतून मुकतात करावी. अशी मागणी सरपंच दत्तात्रय आंधळे, उपसरपंच संगिता आव्हाड, शिवनेरी उद्योग समुहाचे शिवाजीराव इलग, पोलीस पाटील विठ्ठल आंधळे, दिलिप आंधळे, भिकाजी सांगळे, शंकर खामकर, सतिष आंधळे, संदीप आंधळे, संजय फड, कैलास आंधळे, अजय आंधळे, पांडुरंग आंधळे, शंकर आंधळे, सुदाम आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, जितेंद्र इलग, राहुल सांगळे, गणेश आंधळे, गणेश सांगळे, संदीप नागरे, हरिभाऊ वाघ आदिसह परिसरातील नागरीकानी केली आहे.