११० वर्षात पहिल्यादाच आश्वी खुर्द सेवा सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीचा बिगुल वाजला

संगमनेर Live
0
आ. विखे पाटील व ना. थोरात गटात होणाऱ्या थेट लढतीत नेत्याची प्रतिष्ठा पणाला

◻ ११० वर्षात पहिल्यादाच आश्वी खुर्द सेवा सोसायटीच्या निवडणूकीत पुर्ण पँनल मैदानात

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ११० वर्ष जुन्या ऐतिहासिक अशा स्वातंत्र्य पुर्व काळातील सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत पहिल्यादाचं पुर्ण पँनल निवडणूक रिगंणात उतरला आहे. १३ जागासाठी होणाऱ्या निवडणूकीत २६ उमेदवार रिगंणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व कॉग्रेसचे जेष्ठ नेते महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात याच्या गटात सत्तास्थापनेसाठी रणसंग्राम होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने स्थानिक गाव पुढाऱ्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आश्वी खुर्द सेवा सोसायटीला ऐतिहासिक महत्व असून मागील ११० वर्षात येथे १९७५, ८७-८८ साली काही जागासाठी निवडूक प्रक्रीया पार पडली होती. मात्र पुर्ण १३ जागासाठी एकदाही निवडणूक प्रक्रीया झालेली नाही. यावेळी मात्र आ. विखे पाटील व ना. थोरात याचे कार्यकर्ते एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ८ जागेसाठी आ. विखे पाटील गटाकडून भोसले विजय माधवराव, गायकवाड विठ्ठल बजाबा, मांढरे राजेद्रं प्रभाकर, खर्डे ज्ञानेश्वर प्रभाकर, शिदें भाऊसाहेब संपत, कोडोंलिकर प्रशांत निळकंठ, सोनवणे रमेश शिवाजी, भवर स्नेहलकुमार विजय, तर ना. थोरात गटाकडून मांढरे दत्तात्रय किसन, गायकवाड पांडुरंग भागाजी, भवर बापूसाहेब माधव, गायकवाड विठ्ठल मारुतराव, डुबे कुणाल दिलिप, गायकवाड विठ्ठल त्रिबंक, गायकवाड बाळासाहेब कुंडलिक, शिदें संपत भिमाजी हे १६ उमेदवार सर्वसाधारण गटातून रिगंणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिला राखीव प्रवर्गातून दोन जागासाठी आ. विखे गटाकडून गायकवाड शोभाताई बाळासाहेब, गायकवाड सुरेखा प्रकाश तर ना. थोरात गटाकडून गायकवाड सुनिता रमेश, सैय्यद खतीनाबी छन्नुभाई, अशा ४ जणी समोरासमोर ऊभे ठाकले आहे.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी आ. विखे गटाकडून मुन्तोडे राजेद्रं अंन्तोन तर ना. थोरात गटाकडून बर्डे पांडुरंग आप्पा याच्यात लढत होणार आहे.

इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी आ. विखे गटाकडून गायकवाड दत्तात्रय बापूसाहेब तर ना. थोरात गटाकडून भोसले संजय गबाजी अशी लढत तसेच भ. जा. वि. ज प्रवर्गातील एका जागेसाठी आ. विखे गटाकडून वाल्हेकर भास्कंर पांडुरंग, तर ना. थोरात गटाकडून वाल्हेकर मयुर गणपत याच्यात सरसरळ लढत होणार आहे.

त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चागलेचं तापले असून एकास एक लढत होणार असल्याने उमेदवाराची धाकधूक चागलीच वाढली आहे. यामुळे सभासदाची मर्जी सांभाळण्यासाठी उमेदवाराच्या रात्री अपरात्री सभासदाच्या दारी येरझाऱ्या वाढल्या आहेत. ६ मार्च २०२२ रोजी मतदान प्रक्रीया व त्यानतंर लगेचं मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

११० वर्षानतंर पहिल्यादाच पुर्ण १३ जागासाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने सोसायटीच्या या निवडणुकीत गावपाटीलकीच्या नेत्यांची कसोटी लागणार असून अनेक मातब्बर नेत्यांना आपल्या होमपीचवरील सेवा सोसायटी ताब्यात ठेवण्याचे खडतर आव्हान पेलावे लागणार आहे. सेवा सोसायटीत पुढील पाच वर्ष सत्ता ताब्यात रहावी यासाठी गावातील मातब्बर नेते रात्रीचा दिवस करतील कारण की, आगामी ग्रामपंचायत निवडणूकीची ही रंगीत तालीम ठरणार असल्याने या निवडणूकीत शह-काटशहाच्या राजकारणाला वेग येणार आहे. तर जसा - जसा मतदानाचा दिवस जवळ येईल तसा - तसा निवडणुकीचा ज्वर वाढत जाणार असून मुद्याची लढाई गुद्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सहकाराच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचे दिवास्वप्न तरूण पाहत असल्याने ते प्रस्तापित गावपुढाऱ्याची डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !