◻ दूध संघाने बिनविरोधाची गौरवशाली परंपरा राखली कायम
संगमनेर Live | काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सहकारी दुध संघाची सन २०२२ - २०२७ या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून दूध संघाने आपली बिनविरोधची गौरवशाली परंपरा जपली आहे.
नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक ठरला आहे. आपल्या गुणवत्तेमुळे राजहंस दूध संघ हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा राहिला असून या दूध संघामुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली व महानंदाचे अध्यक्ष व दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२-२७ करिता संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक झाली.
या नवीन संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून दूध संघाचे विद्यमान चेअरमन व महानंदा चे अध्यक्ष रणजितसिंह विजयसिंह देशमुख, लक्ष्मणराव बाळाजी कुटे, आर. बी .रहाणे, भास्करराव मारुती सिनारे, विलास हरिभाऊ वरपे, राजेंद्र नामदेव चकोर, संतोष निवृत्ती मांडेकर, विलास साहेबराव कवडे, बादशहा लक्ष्मण वाळुंज, विक्रम शिवाजीराव थोरात, संजय साहेबराव पोकळे, बबन लक्ष्मण कुऱ्हाडे,
इतर मागासवर्गीय गटातून विष्णू नारायण ढोले, महिला सर्वसाधारण गटामधून सौ. प्रतिभा सोमनाथ जोंधळे व सौ मंदाताई गोरख नवले, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रविंद्र दिनकर रोहम आणि भटक्या विमुक्त जाती जमाती या मतदारसंघातून तुकाराम लक्ष्मण दातीर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीत १७ जागांसाठी ३५ अर्ज दाखल झाले होते. मात्र बिनविरोधची परंपरा कायम जपताना इतर कार्यकर्त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आणि ही बिनविरोध प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवड झालेल्या या नवीन संचालकांचे राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, बाबासाहेब ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, अमित पंडित, संपतराव डोंगरे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, सौ. मीराताई शेटे, शंकराव खेमनर यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.