संगमनेर Live | छत्रपती शिवाजी महाराजानी जातीभेद व पंथभेद न करता सर्व जाती व धर्माच्या लोकाना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. छत्रपती शिवराय रयतेशी कसे वागत होते हे नव्या पिढीनी अभ्यासने गरजेचे असून काही निवडक प्रसंगाची तोडकी माहिती आपण न घेता शिवरायाचा संपुर्ण इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजानाचं ‘ रयतेचे राजे ’ म्हटले जाते. त्यामुळे शिवरायाचा पराक्रम हा इतरापेक्षा काकणभर सरस ठरतो, असे गौरोउदगार जिल्हा गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल कटके यानी काढले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अनिल कटके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलीस निरीक्षक सुभाष भोये, अभिनेते व शिवव्याख्याते दिपक कर्पे, सैनिक कल्याण समितीचे प्रमुख रायभान पवार, प्रवक्ते संजय राहाणे, माजी पंचायत समिती सदंस्य सरुनाथ उंबरकर, विखे पाटील कारखाण्याचे माजी संचालक भागवत उंबरकर, आश्वी बुद्रुकचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, आश्वी खुर्दचे सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे आदिसह पंचक्रोशीतून आलेले आजी माजी सैनिक व शिवरायाचे मावळे उपस्थित होते.
याआधी किल्ले शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीला मानवंदना देऊन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थिताच्या हस्तें करण्यात आले. तसेच शिवव्याख्याते दिपक कर्पे यांचे धमन्यामधील रक्त सळसळवणारे व्याख्यान झाले. याप्रसंगी पंचक्रोशीतून आलेल्या आजी माजी भारतीय सैन्यदलातील सैनिकाचा शहाबाई तात्याबा उंबरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने स्मृतीचिन्ह व डॉ. गायकवाड हॉस्पिटल व स्री नेत्रालयाकडून अग्निपखं हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, सरुनाथ उंबरकर, माजी सैनिक रायभान पवार आदिनी मनोगताच्या माध्यमातून शिवरायाना अभिवादन केले.
दरम्यान या कार्यक्रमावेळी प्रा. घोलप प्रा. जाधव, संपत भुसाळ, अनिल भुसाळ, राहुल शिंदे, प्रकाश उंबरकर, तुषार ताजणे, डॉ. सचिन उंबरकर, डॉ. अभिजीत गायकवाड, बाबासाहेब शिंदे, बबन खेमनर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश उंबरकर व आभार डॉ. सचिन उंबरकर यानी मानले असून उपस्थिताचे लक्षवेधून घेणारे सूत्रसंचालन प्राध्यापक एस. के. सागर यानी केले आहे.
आजी माजी सैनिकाचा झाला सन्मान..
यावेळी सैनिक कल्याण समितीचे प्रमुख रायभान पवार, प्रवक्ते संजय राहाणे, सुनिल देवराम गायकवाड, सुरेश सावळेराम गायकवाड, सर्जेराव भाऊसाहेब गायकवाड, संतोष वसंतराव पिलगर, नितिन गणपत शिदें, संपत मारुती ताजणे, दिलिप केशव तक्ते, विकास सावळेराम साळवे, सुनिल बाबुराव पारधी, दिपक शिवाजी गायकवाड, दत्तात्रय चिमाजी चितळकर, बाबासाहेब एकनाथ आंधळे, गंगाधर नाना भुसाळ, संतोष भाऊसाहेब मैदड, सुनिल गणपत गिते, सुनिल किसन बळीद, राजेद्रं बबन माळी, सचिन विजय रुपवते, नंदकिशोर बाप्पुराव गायकवाड, गणपत मारुतराव जगताप, दत्तात्रय राधाकृष्ण माळी, काशिनाथ विठोबा बिडवे, सुनिल रंगनाथ ताजणे, शामराव मिनीनाथ पांडे, दामोदर रामचंद्र भोसले, साहेबराव पाराजी फड, सचिन भास्कंर शिदें या भारतीय सैन्यदलातील आजी माजी सैनिकाचा शिवजयंती दिनी संत्कार करण्यात आला.