◻ उंबरी बाळापूर येथे भेटीदरम्यान साधला कुटुंबियाशी संवाद
संगमनेर Live | कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यानी नुकतीचं संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल खेमनर व माळी कुटुंबियाच्या घरी भेट देऊन घरातील निधन झालेल्या व्यक्तीना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
ना. बाळासाहेब थोरात हे आपल्या जुन्या व एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या सुख दु:खात नेहमी सहभागी होत असतात. त्याच अनुशगाने नुकतेचं उंबरी बाळापूर येथिल जेष्ठ कार्यकर्ते व संगमनेर शेतकरी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर यांच्या मातोश्री तान्हाबाई सखाराम खेमनर याचे निधन झाल्यामुळे भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी खेमनर कुटुंबियाचे सात्वंन केले.
थोर स्वातंत्र्य सेनानी व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात याचे सहकारी असलेले उंबरी बाळापूर येथील दिगबंर मुरलीधर माळी यांचे मागील काही दिवसापूर्वी निधन झाले होते. दिवगंत दिगबंर माळी यानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यानी सुरु केलेल्या मिटर हटाव मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला असल्याने ते तालुक्यात परिचित होते. त्यामुळे माळी कुटुंबाच्या घरीही ना. थोरात यानी भेट देऊन युवा कार्यकर्ते कृष्णा माळी व सर्व माळी कुटुंबियाचे सात्वंन करत जुन्या आठवणीना उजाळा दिला.
दरम्यान याप्रसंगी मुकुंद माळी, भाऊसाहेब खेमनर, रामराव माळी, साहेबराव भुसाळ, सुभाष वाघमारे, दिपक माळी, अविनाश ननावरे, अनिल भुसाळ, विवेक डोखे, मच्छिद्रं भुसाळ, लहानू डोखे, नंदू महानुभव, अशोक उंबरकर, दादाभाई शेख, हौशाबापू खेमनर, दत्तु खेमनर, बाबासाहेब खेमनर, अशोक शेळके, मच्छिद्रं बिडवे, ज्ञानेश्वर ननावरे, पत्रकार सुरेश थोरात आदिसह जेष्ठ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.