◻ निमगावजाळी येथून दुचाकी चोरनाऱ्या तिघाना आश्वीतून घेतले ताब्यात
प्रतापपूर शिवारातून दुचाकी केली हस्तंगत
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील मंगलकार्यालयाच्या आवारातून ५ फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरी झाल्यानतंर अवघ्या २४ तासात आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्या मार्गदर्शनाखाली पोलीसानी आश्वी बुद्रुक येथून तीन जणाना ताब्यात घेत दुचाकी चोरीचा तपास लावला आहे.
याबाबत लोणी येथील रोहित दिवटे याने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यामध्ये म्हटले होते की, मी लग्नानिमित्त निमगावजाळी येथिल मंगलकार्यालय येथे आलो होतो. लग्न आटोपल्यानतंर घरी जाण्यासाठी निघलो असता, माझी दुचाकी मी उभी केलेल्या ठिकाणी आढळून न आल्यामुळे मी मंगलकार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यामध्ये दोघे जण माझी दुचाकी चोरीच्या इराद्याने घेऊन गेले. त्यामुळे गुन्हा रंजिस्टर नंबर १६/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सुभाष भोये यानी तात्काळ तपासाची सुत्रे फिरवत आपल्या सहकार्याना घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याच्या सुचना दिल्या. पोलीसानी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करत मोठ्या शिताफीने २४ तासात महेश सरोदे (वय - २२), आदिनाथ गायकवाड (वय - १९) व महेश वर्पे (वय - २९) तिघे रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर याना ताब्यात घेतले.
दरम्यान प्रतापपूर शिवारातील काटवणातून दुचाकी पोलीसानी हस्तगत केल्याची माहिती दिली असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. बी. भाग्यवान, विनोद गंभिरे, हुसेन शेख, अमर दाडंगे, प्रविण दहिनिवाल, आनंद वाघ व निलेश वर्पे आदिनी ही कामगिरी बजावली आहे.