संसदेमध्ये माझ्याबद्दल कोण काय बोलत याला मी महत्व देत नाही.
संगमनेर Live (राहाता) | गोर - गरीबांच्या मिठाला आम्ही जागतो म्हणुगोर - गरीबांच्या मिठाला आम्ही जागतोनच सामान्य माणून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्याची पावती मोठ्या मताधिक्याच्या रुपाने आम्हाला मिळते असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. संसदेमध्ये सामान्य माणसाचीच बाजु आपण प्रामाणिकपणे मांडत असून, यावर कोण काय बोलतय याला मी फारस महत्व देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोटखराबा मुक्त गाव योजनेला शिर्डी विधानसभा मतदार संघात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. कोऱ्हाळे येथे या योजनेचा शुभारंभ झाला. कोऱ्हाळे आणि वाळकी या गावातील सुमारे ५५० हेक्टर पोटखराबा असलेले क्षेत्र आता लागवडयुक्त होणार असल्याने या जमिन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कोऱ्हाळे येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. शिर्डी विधानसभा मतदार संघात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन, सातबारा उताऱ्यावर पोटखराबा अशी नोंद असलेल्या जमिन धारकांना दिलासा देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी तहसिलदार कुंदन हिरे, भूमिअभिलेख विभागाचे उपअधिक्षक नरेंद्र पाटील, गोदावरी दूध संघाचे माजी संचालक उत्तमराव डांगे, भाजपाच्या किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब डांगे, उपाध्यक्ष दत्तात्रय डांगे, वैशाली थोरात, ज्ञानेश्वर डांगे, खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतिष बावके आदि याप्रसंगी उपस्थित होते.
पोटखराबा अशी नोंद असलेल्या जमिन धारकांसाठी विशेष मोहीम आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात सुरु करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये पोटखराबा अशी नोंद लागल्यामुळे जमिन धारकांना कोणतेही पीक घेता येत नाही. ही नोंद रद्द व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी होती. त्यानुसार जमिनधारकांसाठी कागदपत्रांची प्राथमिक पुर्तता करता यावी यासाठी अशा पध्दतीच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
शिर्डी विधानसभा मतदार संघात मागील अनेक वर्षांपासुन सामान्य माणसासाठी काम करण्याची परंपरा अखंडपणे सुरु आहे. सामान्य माणसाच्या खालल्या मिठाला आम्ही जागत असल्यामुळेच जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. परंतू तुम्ही खालल्या मिठाला जागत नाही म्हणून नगर दक्षिण मध्ये तुम्हाला पराभव स्विकारावा लागला असा टोला गलावून खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या १४ वा वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजावरच राज्य सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे. परंतू यासाठी भविष्यात कायदेशिर लढाई करावीच लागेल असा सुचक इशाराही त्यांनी दिला.
मतदार संघात केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिली, ९९ टक्के लसिकरण हे पुर्ण होवू शकले. वयोश्री योजना, मोफत धान्य आणि रेशनकार्डची पुर्तता होत असल्यामुळेच सामान्य माणसाला विखे पाटील कुटूंबियांचा आधार वाटत असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.