आ. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या ताब्यातील सेवा सोसायट्याचे बुरुंज अभेद्यचं

संगमनेर Live
0
आश्वी खुर्द सेवा सोसायटीत १३-० तर शेडगाव सेवा सोसायटीत १२-० ने मिळवला एकहाती विजय

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील प्रतिष्ठेच्या अशा आश्वी खुर्द सेवा सोसायटी १३-० व शेडगाव सेवा सोसायटीत १२-० ने आ. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने एकहाती विजय मिळवत दोन्ही सेवा सोसायट्या पुन्हा आपल्या ताब्यात राखल्यामुळे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.

आश्वी खुर्द व शेडगाव सेवा सहकारी सोसायटीची नुकतीचं पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्सहात पार पडली. भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळ व राज्याचे महसूलमंत्री कॉग्रेसचे जेष्ठ नेते ना. बाळासाहेब थोरात याच्या शेतकरी विकास मंडळ अशा दोन पँनलमध्ये दोन्ही ठिकाणी रंगतदार लढत झाली. यामध्ये आ. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द करत दोन्ही सेवा सोसायट्या आपल्या ताब्यात राखल्याचे निकालनतंर स्पष्ट झाले आहे.

यावेळी आश्वी खुर्द सेवा सोसाटीत जनसेवा मंडळाचे उमेदवार प्रशांत कोडोंलिकर (२३३), ज्ञानेश्वर खर्डे (२५५), विठ्ठल बजाबा गायकवाड (२४३), स्नेलकुमार विजय भवर (२२३), विजय माधव भोसले (२४१), राजेद्रं प्रभाकर मांढरे (२४९), भाऊसाहेब संपत शिदें (२३१), रमेश शिवाजी सोनवणे (२६९), भाऊसाहेब पांडुरंग वाल्हेकर (२७७), शोभाताई बाळासाहेब गायकवाड (२५५), सुरेखा प्रकाश गायकवाड (२७८), राजेद्रं अन्तवन मुन्तोडे (२७६) व दत्तात्रय बापूसाहेब गायकवाड (२४७) मते मिळवून विजयी झाले असून याठिकाणी जनसेवा मंडळाने १३-० ने विजय संपादित करत विजयाची औपचारिकता पार पाडली आहे.

शेडगाव सेवा सोसायटीत जनसेवा मंडळाचे उमेदवार निवृत्ती बाबुराव सांगळे (३१०), सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड (३०२), अशोक नामदेव फड (२८१), नानासाहेब खंडु आंधळे (२७९), सोन्याबापू भिकाजी सांगळे (२७६), निवृत्ती देमाजी आमले (२७५), दादासाहेब बाबुराव फड (२६१), विजय पांडूरंग नागरे (२५९), लक्ष्मीबाई पांडूरंग नागरे (२८३), मंदा ज्ञानेश्वर सांगळे (२८२), अहिल्या रामा साळवे (२७४) व रमेश किसन नागरे (२६७) हे निर्णायक मते मिळवून विजयी झाले असून याठिकाणी १२-० ने जनसेवा मंडळाने पुन्हा एकदा मैदान मारत सत्ता राखली आहे.

दरम्यान या दोन्ही सेवा सोसायट्याची निवडणूक अटीतटीची झाल्याचे चित्र असले तरी दोन्ही ठिकाणी आ. विखे पाटील गटाचाचं वरचष्मा पहायला मिळाल्याने आ. विखे पाटील यांच्या जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !