◻शिर्डी मतदार संघात साधन साहित्यांचे वितरण सुरु
◻अंमलबजावणीतून ‘ सबका साथ सबका विकास’ हा मंत्र साध्य
संगमनेर Live (लोणी) | राष्ट्रीय वयोश्री योजना ही देशाची एक महत्वकांक्षी योजना ठरली आहे. ६० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या योजनेतून आधार दिला. देशभर सुरु असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीतून ‘सबका साथ सबका विकास' हा मंत्र साध्य होत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील सर्व नागरिकासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा अपंग व दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये कॅम्प घेण्यात आले होते. यामध्ये जेष्ठ नागरीकांना मंजुर झालेल्या साधन साहित्यांचे वितरण शिर्डी मतदार संघात सुरु करण्यात आले. लोणी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जेष्ठ नागरीकांना ही साधन साहित्य सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संचालक संजय आहेर, बापूसाहेब आहेर, दादासाहेब घोगरे, रायभान आहेर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल निवृत्ती घोगरे, भानुदास घोगरे आदीसह लाभार्थी उपस्थित होते.
आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, वयोश्री योजना देशातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. जिल्हातील ३७ हजार वयोवृद्धांना यांचा लाभ मिळत असून, हे श्रेय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आहे. ज्यांना जनतेसाठी काही करायचे नाही त्यांच्यासाठी या योजनेतील मिळणारे साहीत्य मोठी चपराक आहे. केवळ एका आधारकार्ड या नागरीकांना त्यांच्या वृध्दपकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा आधार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आज दिसतोय त्यातून काम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी या योजनेतून जेष्ठांचा विचार ७० वर्षानंतर केल्याबद्दल लाभार्थ्याच्या वतीने पंतप्रधानाचे आ. विखे पाटील यांनी आभार मानले.
जिल्हातील प्रत्येक ६० वर्षापुढील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगून अजूनही काही साहीत्य पाहीजे असले तर त्यासाठीही पुन्हा नोंदणी शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगून, नोंदणी शिबिरानतंर अनेकांनी शंका घेतली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहीत्य देशात तयार करुन, या योजनेतून मोठा दिलासा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेपेक्षा सेवाभावी कामातच आपला आनंद आहे. आपल्या सारख्या जेष्ठांचे आशिर्वाद हाच आमच्यासाठी खुम सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. शांताराम चौधरी यांनी तर आभार कारखान्याचे संचालक संजय सोपानराव आहेर यांनी मानले.