◻दिवगंत मा. खासदार पद्मभुषन डॉ. बाळासाहेब विखे पाटील याच्या आठवणीना दिला उजाळा
◻आ. विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील याच्या कामाचे कौतुक
संगमनेर Live | मनसेचे नेते बाळा नांदगावकर यानी नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची नुकतीचं भेट घेतली होती. याबाबत त्यानी फेसबुक पोस्ट लिहुन माहिती दिली. यावेळी त्यानी विखे पाटील कुटुंबाशी असलेला स्नेह व दिवगंत मा. खासदार पद्मभुषन डॉ. बाळासाहेब विखे पाटील याच्या आठवणीना उजाळा दिला आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर याची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी..
समर्थ वारसा
तरुण, सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावे हे आपण वेळोवेळी बोलत असतो. नगर दौऱ्यावर असतांना खासदार डॉ सुजय विखे यांची भेट झाली. स्वतः उच्चशिक्षित डॉक्टर असले तरी जमिनीवरील विविध विषयांची त्यांना खुपच चांगली माहिती आहे. सुजय चे वडील आमदार राधाकृष्ण विखे पाटील व मी आम्ही 20 वर्षे सदनात एकत्र आमदार म्हणून तर काही वर्षे एकाच पक्षात एकाच जिल्ह्यात कार्य केले असल्याने माझा आणि त्यांचा अतिशय जवळचा असा स्नेह आहे.
विखे कुटुंब म्हणजे सहकार क्षेत्रातील अतिशय आदरयुक्त घेतले जाणारे नाव. स्व. माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. अनेक वर्षे एकत्र काम करताना बाळासाहेब विखे यांची काम करण्याची व छोट्यात छोटा कार्यकर्ता जपण्याची शैली मला कायमच प्रभावित करत आली.
स्व. बाळासाहेबांनी रचलेल्या पायावर आमदार राधाकृष्ण विखे यांनी अतिशय मजबूत सामाजिक कार्याची इमारत उभारली व आता हाच समाजसेवेचा वारसा डॉ सुजय हे अतिशय समर्थपणे पूढे घेऊन जात या सर्व इमारतीला अभिमान वाटेल असा कळस चढवत आहे.
नगर शहरातील उड्डाणपूल ही त्यांच्या तडफदार कार्याची झलकच आहे. राजकारणी भेटले तर राजकीय गप्पा तर होणारच त्या यावेळी सुद्धा रंगल्या.
एकूणच सुजय शी संवाद साधताना मला वारंवार स्व. बाळासाहेब विखेंची झलक दिसून येत होती.
आपला नम्र
बाळा नांदगावकर