दाढ बुद्रुकचा भुमिपुत्र ऐतिहासिक ‘पावनखिंड’ चित्रपटात साकारतोय नऊ भुमिका

संगमनेर Live
0
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या चित्रपटातील प्रसाद भागवतच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक

◻अतुलनीय शौर्याच्या यशोगाथेचा चित्तथरारक चित्रपट महाराष्ट्रात हाऊसफूल

संगमनेर Live | शिवजयंतीच्या महूर्तावर सपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला व शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटात राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक सारख्या ग्रामीण व सहकाराचा वारसा लाभलेल्या मातीत जन्माला आलेला अभिनेता प्रसाद त्रंबक भागवत हा तरुण या चित्रपटात विविध छटा असलेल्या बहुआयामी नऊ भुमिका साकरत असून त्याच्या अभिनयावर ग्रामीण भागातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा दाखवण्यात आली असून या चित्रपटात मॉसाहेब जिजाऊची भूमिका अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व छत्रपती शिवरायाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर यानी साकारली आहे. तसेच बाजीप्रभु देशपाडे याची मध्यवर्ती भूमिका अजय पुरकर यानी आपल्या खांद्यावर यशंस्वी पेलली आहे. याचं चित्रपटात बांदल सेनेच्या मावळा, कातकरी, धनगर अशा विविध नऊ भूमिकेत प्रसाद भागवत यानी जीव ओतून दमदार अभिनय केला आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन व कलाकारांनी साकारलेल्या अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

प्रसाद भागवत हा तरुण दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथिल रहिवासी असून त्याने महात्मा फुले माध्यमिक विद्यालय व प्रवरा रुरल पॉलिटेक्निक महाविद्यालयातून मँकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादित केली आहे. त्याना शालेय व महाविद्यालयीन जीवनात अभिनयाची आवड लागली होती. शिक्षण पुर्ण झाल्यानतंर पुणे येथील नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरी करत असताना मित्राच्या सहवासातून मराठी चित्रपट टँलट संघटनाशी संपर्क आला व अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. यांच काळात जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, संजय पाटील आदिची भेट झाली. त्यामुळे विविध नाटकामधून लहान मोठ्या भूमिका करण्याचा अनुभव मिळत गेल्याची माहिती जेष्ठ पत्रकार संजय गायकवाड याच्याशी बोलता प्रसाद भागवत यानी दिली.

राष्ट्रवादी प्रदेश कॉग्रेसचे चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक विभागाचे चिटणीस डॉ. अशोक गावीत यांची माझ्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीत महत्वाची भुमिका असून वडीलाचे मामा असलेले अँड. बाबुराव आभाळे याची देव आनंद याचे चुलते सराफ याच्याबरोबर मैत्री असल्याने बालपणीच चित्रपटसृष्टी जवळून पाहण्याचा योग आल्याची माहिती अभिनेते प्रसाद भागवत यानी दिली. 

छत्रपतीच्या ऐतिहासिक अशा ‘पावनखिंड’ चित्रपटात मला अभिनय करण्याची संधी मिळाली. मराठमोळा पोशाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल - ताशे व तुताऱ्या यामुळे एक वेगळी उर्जा व उत्साह माझ्यामध्ये निर्माण झाला आहे. तसेच राजगडाच्या पायथ्याशी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही शिवकाळात असल्याची भावना प्रत्येक कलाकारामध्ये निर्माण झाल्यामुळे प्रत्येकजण हा मनोमन छत्रपती शिवरायाना वदंन करत होता. असे अभिनेता प्रसाद याने यावेळी आवर्जून सांगितले असून अगामी काळात सत्यघटनेवर आधारित ‘जोखड’ या चित्रपटातून आपण दर्शकाच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटात अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !