पानोडी सेवा सहकारी सोसायटीवर ना. थोरात गटाची एकहाती सत्ता

संगमनेर Live
0
सहकाराचे सच्चे कार्यकर्ते असलेल्या दिवगंत नेते शिवाजीराव थोरात याना सभासदाची श्रध्दांजली

◻ ९६ वर्षात पदार्पण करणारी शेतकऱ्याची कामधेनू पुन्हा ना. थोराताच्या अधिपत्याखाली

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या अशा ९६ वर्ष जुन्या पानोडी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत महसूलमंत्री ना. थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाने १३-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला असून सर्व विजयी उमेदवारानी एकहाती बहुमत दिल्यामुळे सर्व सभासदाचे आभार मानले आहेत. यावेळी सहकाराचे सच्चे कार्यकर्ते असलेल्या दिवगंत नेते शिवाजीराव थोरात याचे नुकतेचं निधन झाल्याने सभासदानी ही त्याना विजयाची श्रध्दांजली अर्पण केल्याची भावाना जेष्ठ कार्यकर्त्यानी व्यक्तं केली आहे.

पानोडी सेवा सहकारी सोसायटीच्या १३ जागासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. कॉग्रेसचे जेष्ठ नेते महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील याना माननाऱ्या गटाच्या दोन पँनलमधील उमेदवारानमध्ये यावेळी लढत झाली. यामध्ये शेतकरी विकास मंडळाने १३-० ने एकहाती विजय मिळवल्याने तेच सत्ता स्थापन करणार असल्याचे निकालानतंर स्पष्ट झाले आहे.

यावेळी सर्वसाधारण प्रवर्गातून विनायक शिवाजीराव थोरात (३१६), विठोबा शंकर जाधव (३०१), कारभारी गंगाधर जाधव (३००), भाऊसाहेब तुकाराम तळेकर (२९७), कारभारी भागा साबळे (२९७), मधुकर सखाराम ढोणे (२९१), रावसाहेब सबाजी हजारे (२९०), बबन पांडुरंग कराड (२८८) हे ८ उमेदवार विजयी झाले. महिला राखीव प्रवर्गातून नवसाबाई शांताराम खैरे (२९०) व पुष्पा महादू पाबळ (२९३) या दोन महिला विजयी झाल्या. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून नामदेव किसन सानप (३१४), अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून भाऊसाहेब यादव मुन्तोडे (२९२) हे विजयी झाले असून इतर मागास प्रवर्गातून आप्पासाहेब नामदेव खेडकर याची बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान मागील काही पंचवार्षिक निवडणूका या अटीतटीच्या झाल्या असल्यातरी ना. थोरात याच्या गटाचेच येथे वर्चस्व पहायला मिळाले आहे. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. शेख यानी काम पाहिले असून प्रवीण आढाव, प्रकाश कडलग, मोहन पवार, मुकुंद सातपुते, राजेश जोशी, भाऊसाहेब तांबे, विकास जोधंळे, भिमराज वर्पे, कृष्णा बस्ते, बाबासाहेब वर्पे, बाबासाहेब भवर व चतुरे यानी त्याना मदत केली.

दिवगंत नेते शिवाजीराव थोरात यानी निस्वार्थ भावनेतून प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया सर्व विजयी उमेदवारानी दिली असून या सर्व विजयी उमेदवाराचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, राजहसं व महानंद दूध संघाचे चेअरमन रनजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेद्रं चकोर, पानोडी गावचे मार्गदर्शक विनायकराव थोरात, संगमनेर दूध संघाचे संचालक विक्रम थोरात, प्रमोद बोद्रे, डॉ. संजय सागळे, विठ्ठलराव मारुतराव गायकवाड, विजयराव हिगें, आश्वी बुद्रुकचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पानोडीचे सरपंच गणपत हजारे आदिसह ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !