◻ प्रवरा परिवाराचा जेष्ठ मार्गदर्शक हरपला - आ. राधाकृष्ण विखे पाटील
◻ वडीलकीच्या नात्याने त्यांचे सदैव मोलाचे मार्गदर्शन
◻ प्रवरा सहकारी बॅकेचा वटवृक्ष करण्यात कॅप्टन गुणे यांचे योगदान
संगमनेर Live | प्रवरा सहकारी बॅकेचे माजी चेअरमन कॅप्टन विजयराव गुणे यांच्या निधनान प्रवरा परिवाराचा एक मार्गदर्शक हरपला असल्याची संवेदना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कॅप्टन विजयराव गुणे यांच्या निधनाचे वृत्त हे खुप धक्कादायक आहे. गेली अनेक दिवस आजारपणाला तोंड देत असले तरी, त्यांच्यातील सकारात्मकता ही खुप महत्वाची होती. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्याप्रमाणेच मला वडीलकीच्या नात्याने त्यांचे सदैव मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवरा सहकारी बॅकेचा वटवृक्ष करण्यात कॅप्टन विजयराव गुणे यांचे योगदान खुप महत्वपूर्ण होते. सलग २५ वर्षे अतिशय शिस्तीनं आणि सभासदांच्या हितासाठी त्यांनी बॅकेच्या माध्यमातून निर्णय केले. प्रवरा परिवारातील सर्व संस्था आणि व्यक्तिंनी त्यांनी सदैव मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनानं प्रवरा परिवाराचा एक मार्गदर्शक गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
कॅप्टन विजयराव वामन गुणे याचे वय मृत्यूसमयी ८४ वर्ष होते. भारतीय सैनदलातून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आश्वी परिसरात विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रासह विकासत्मक प्रक्रियेत पुढाकार घेतला. आर्थिक क्षेत्राचा गाढा अभ्यास असल्याने दिवगंत मा. खासदार पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी संपर्क आला. प्रवरा सहकारी बँकेच्या जडणघडणीत त्याचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात सुन, दोन नातू व मुलगी असा परिवार आहे.