◻ बोऱ्या बिस्तरा बांधून मुन्नाभाई झाला फरार
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आरोग्य सेवेची कोणतीही पदवी नसताना एक बोगस मुन्नाभाई डॉक्टर मागील अनेक वर्षापासून लोकाची उपचाराच्या नावाखाली फसवून करत असल्याची माहिती उजेडात आली होती. मात्र या मुन्नाभाईवर कारवाई बाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नव्हती. अखेर वरिष्ठानी दिलेल्या सुचनावरुन आश्वी पोलीस ठाण्यात शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो मुन्नाभाई पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात आश्वी खुर्दचे आरोग्य आधिकारी कोडांजी मदने यानी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पानोडी गावात कोणताही वैदकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना डॉ. असिम दास (पुर्ण नाव माहित नाही) हा त्याच्या नावाचा फलक लावून लोकाना डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक करत होता.
वैदकीय व्यावसायाची एन. डी. ही पदवी नसताना या पदवीचा फलकावर उल्लेख करुन महाराष्ट्र कौन्सिलची कोणतीही नोदंणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करून पळून गेला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान डॉ. असिम दास याच्याविरुद्ध गुन्हा रंजिस्टर नंबर ३५/२०२२ नुसार भादंवी कलम महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम ३३ व ३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. एस. पवार हे करत आहेत. तर हा मुन्नाभाई बोऱ्या बिस्तरा बांधून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.