वरवंडी सेवा सहकारी सोसायटीवर स्थापलिंग ग्रामविकास पँनलचे वर्चस्व

संगमनेर Live
0
स्थापलिंग ग्रामविकास पॅनलचा १३ जागावर दणदणीत विजय

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत स्थापलिंग ग्रामविकास पॅनलने १३ जागेवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले.

स्वातंत्र्य पूर्व काळात या विकास सेवा सहकारी सोसायटीची स्थापना झाली असून नुकत्याचं झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत स्थापलिंग ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारानी सोसायटीच्या निवडणुकीत १३ - ० ने मात करत आपले वर्चस्व राखले. या विजया करिता स्थापलिंग ग्रामविकास पॅनलच्या जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यानी विजयासाठी मोठे परिश्रम घेतले.

यावेळी झालेल्या वरवंडी सेवा सोसायटीच्या मतदानात ५२२ सभासदापैकी ४९७ सभासदानी मतदानाचा हक्क बजविला. यामध्ये स्थापलिंग ग्रामविकास पॅनलच्या १३ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. 

यामध्ये सर्व साधारण प्रवर्गातून राजाबापू वर्पे (३१४), उल्हास गागरे (३०९), विलास मोघे (३०६), रावसाहेब पाटोळे (२९६), आण्णा वर्पे (२९४), इंद्रभान बस्ते (२८९), राजेंद्र वर्पे (२८५), गिताराम शिंदे (२८३ ), अनु जाती व जमाती प्रवर्गातून बबन भोसले (३१५ ), महीला राखीव प्रवर्गातून सौ. विमल गोवर्धन वर्पे (३१७ ), सौ. हिराबाई शंकर वर्पे (३११) वि.जा. मागास प्रवर्गातून दौलत यरमल (३२९)  तर इतर मागास प्रवर्गातून सुदाम काळे (३२४) विजयी झाले आहेत.

दरम्यान यावेळी निवडणुक निर्णय आधिकारी म्हणून ए. एस. शेख तर सहाय्यक प्रकाश कडलग, मोहन पवार, मुकुुंद सातपूते, राजेश जोशी, भाऊसाहेब तांबे, विलास जोधळे, भिमराज वर्पे, कृष्णा बस्ते, बाबासाहेब वर्पे, बाबासाहेब भवर, चतुरे यानी काम पाहिले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !