◻ आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी लढाई तिव्र करण्याचा दिला इशारा
◻ विरोधी पक्षनेते फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस पाठविणे म्हणजे त्यांच्या विशेष आधिकारांवरच गदा..
संगमनेर Live (शिर्डी) | विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांच्या संदर्भात भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल पोलिसांनी दिलेली नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशीच परिस्थिती महाविकास आघाडीची असून, भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईत फडणवीसांच्या पाठीशी भाजपाच्या कार्यकर्त्यासह राज्यातील जनता खंबीरपणे उभी राहील असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारच्या कृत्याचा निषेध करतानाच महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठीची लढाई अधिक तिव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सर्व प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाहेर काढत आहेत. एकापाठोपाठ एक मंत्री तुरुंगात जात आहे. आणखी किती मंत्र्यांचे नंबर आहेत माहीत नाही, त्यामुळे सैरभैर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाणीवपुर्वक फडणवीस यांना लक्ष करुन, त्रास देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
या लढाईबद्दल फडणवीसांचे अभिनंदन करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, या लढाईत संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे महाविकास आघाडीचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असे विखे पाटील म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी आधी नोटीस पाठविणे म्हणजे त्यांच्या विशेष आधिकारांवरच गदा आणण्यासारखे आहे. यावर सामान्य प्रशासन विभाग एवढा अंधारात कसा.? नोटीस देण्याच्या पोलिसांच्या कृत्याचा भारतीय जनता पक्षाने तिव्र शब्दात निषेध केला.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं यापुढेही बाहेर काढणार असून, भ्रष्टाचाराच्या विरोधातील या लढाईपासुन भाजप कदापीही मागे हटणार नाही अशा कितीही चौकशा केल्या तरी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या विरोधात ही लढाई सुरुच ठेवतील असा इशारा त्यांनी दिला.