◻ आ. विखे पाटील गटाकडे ५ तर ना. थोरात गटाची ८ जागावर सरशी
◻ माजी जिल्हापरिषद संदस्याला पराभवाचा धक्का
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं लौकी अजमपूर सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाल्यामुळे येथील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी ना. थोरात याच्यां शेतकरी विकास मंडळाचे ८ तर आ. विखे पाटील याच्या जनसेवा मंडळाचे ५ उमेदवार विजयी झाल्याने येथे ना. थोरात गटाने सत्ता राखल्याचे निकालानतंर स्पष्ट झाले.
पिप्रीं लौकी अजमपूर सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक स्थानिक पुढऱ्यानी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे याठिकाणी अटीतटीच्या लढत पाहवयास मिळाल्या असून त्यामुळे काही उमेदवाराना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे मतदानावरुन दिसून आले.
यावेळी शेतकरी विकास मंडळाचे बापू कारभारी दातीर (३५१), सिताराम बाळासाहेब दातीर (३१३), बापू सखाराम लावरे (३०६), बाजीराव गंगाधर गिते (३०६), हरीभाऊ शंकर दातीर (३२५), लक्ष्मण गुजाबा दातीर (३२२), संपत देवजी कदम (३३१) व नंदाबाई सोपान दातीर (३११) हे ८ उमेदवार विजयी झाले.
तर जनसेवा मंडळाचे मधुकर कारभारी गिते (३०५), भिमाबाई सोपान गिते (३१४), बाळासाहेब रंगनाथ बिडवे (२७३), गोरक्ष उमाजी गिते (३०९) व अण्णासाहेब पांडुरंग गिते (३०३) हे ५ उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजेद्रं बाळकृष्ण दातीर, माजी चेअरमन प्रभाकर दातीर, माजी सरपंच भिकाजी गिते, किरण राहिजं, शंकर लावरे, शँप्रोचे संचालक भिमाजी राहिजं, कचरेश्वर दातीर, यादव दातीर आदि जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यानी शेतकरी विकास मंडळाचे ८ उमेदवार विजयी करण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.
तसेच जनसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. कान्हू गिते, साहेबराव लावरे, रतन कदम, भारत गिते यानी या निवडणूकीत प्रयत्नाची पराकाष्ठा केली परतूं केवळ ५ उमेदवार निवडूण आणण्यात त्याना यश आले. यावेळी त्याच्या दोन उमेदवाराना निसटता पराभवाचा सामना करावा लागला तर या निवडणूकीत माजी जिल्हापरिषद सदंस्य असलेले रतन कदम याचा पराभव झाल्यामुळे विखे पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ सुलेमान शेख व त्याच्या सहकऱ्यानी काम पाहिले.