◻ महिला दिनी संगमनेर तालुक्याला मिळाला बहुमान
◻ शेतकरी कुटुंबातील मुलीच्या गगनभरारीला मिळाली पतीच्या पंखाची ताकत
◻ बहिनीच्या मैदानी सरावासाठी भावाने ठेवली १ एकर जमीन पडीक
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील खळी हे सासर असलेल्या व तालुक्यातील तिगावची कन्या सौ. अरुणा अनिल कांगणे - सानप यानी महिला दिनी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ३४० पैकी २३५ गुण मिळवून राज्यात ११ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उप निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे सौ. अरुणा याच्यां सासरी व माहेरी आनंद उत्सव साजरा होत असल्याच्या भावना पती अनिल तुकाराम कांगणे यानी ‘संगमनेर Live’ शी बोलताना त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
सौ. अरुणा अनिल कांगणे - सानप या विवाहित असून त्याना ६ वर्षाचा गोड मुलगा आहे. तालुक्यातील तिगांव माहेर असलेल्या शेतकरी कोडींबा गोविंद सानप यांच्या कन्या तर शेडगाव हे आजोळ असून येथिल कैलास म्हतू नागरे यांच्या त्या भाची आहेत. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे तिगाव व शेडगाव या ठिकाणी झाल्यानतंर त्यानी डीएड ची पदवी संपादित केली.
लग्न झाल्यानतंर पती हे शिक्षक असल्याने त्यानी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. नोकरीनिमित्त ते सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. सौ. अरुणा कांगणे यानी लग्नानंतर बी. ए. पुर्ण केले व एच. एस. सी. बोर्डाच्या नाशिक विभागात क्लार्क पदावर सध्या त्या कार्यरत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग्यामार्फत प्रशासकीय सेवेत जाण्याची त्याची इच्छा होती. त्याला पती अनिल कांगणे यानी साथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लग्न झाल्यानंतर सुरु असलेल्या शिक्षणावर नातेवाईक व मित्र परिवारातून टिकाही झाली. वेळो - वेळी मान अपमानही झाला परंतू, यातून खचून न जाता सौ. अरुणा व अनिल कांगणे हे आपल्या निर्णयाशी ठाम राहिल्यामुळे हे यश त्याच्या पदरात पडले आहे.
पत्नीच्या स्वप्नाना उभारी देण्यासाठी २०१९ च्या आधी आपल्या तीन वर्षाच्या मुलाची सपुर्ण जबाबदारी आपल्यावर घेत आई व वडील या दोन्ही भूमिका पेलण्यास अनिल कांगणे यानी सुरवात केली. त्यामुळे जव्हार या आदिवासी भागातील यंशवतराव मुकणे सार्वजनिक वाचणालयात सौ. अरुणा यानी २ वर्ष अभ्यास करुन २०१९ साली दिलेल्या लोकसेवा आयोगाच्या लेखी परिक्षेत ११७ गुण प्राप्त केले.
यामुळे २०२१ मध्ये त्याना मैदानी परिक्षेला उपस्थित राहण्याच्या सुचना मिळाल्या. नाशिक सारख्या शहरी भागात मैदानी सराव कसा करायचा असा प्रश्न सौ. अरुणा त्याच्यापुढे उभा राहिला असता तिगाव येथिल त्याचे बंधू अमोल सानप यानी आपल्या बहिनीच्या मैदानी सरावासाठी १ एकर क्षेत्र पडीक ठेऊन मैदान तयार करुन दिले. पती व भावाच्या मदतीने सौ. अरुणा यानी कसून मैदानी सराव करत झालेल्या मैदानी परिक्षेत ९४ गुण प्राप्त केले.
तर मुलाखतीत ही त्यानी बाजी मारल्यामुळे लोकसेवा आयोगाकडून ८ मार्च या जागतिक महिला दिनी जाहीर झालेल्या यादीत त्याची पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाल्याची माहिती कळताचं पती अनिल कांगणे याना आनंद आश्रु लपवता आले नाहीत.
महिलाचे प्रश्नं हे महिला चागल्या पध्दतीने माडू व सोडवू शकतात. त्यामुळे प्रशासकीय सेवेसह सर्व क्षेत्रात मुली व महिलानी आले पाहिजे. आज मी जे यश मिळवले त्यामध्ये माझे पती, सासु, सासरे, आई, वडील व भाऊ यांचा सिहांचा वाटा असून भविष्यात क्लास वन अधिकारी होण्याचे माझे स्वप्नं आहे.
सौ. अरुणा अनिल कांगणे, नुतन पोलीस उप निरीक्षक