◻ आश्वी बुद्रुक येथे निबंध स्पर्धा तर आश्वी खुर्द येथे व्याख्यानाचे आयोजन
संगमनेर Live | आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतील गावानमध्ये महामानवाच्या विचाराचा जागर केला जाणार आहे.
आश्वी बुद्रुक येथे जयंती उत्सव समिती व भिमगर्जना युवा प्रतिष्ठाणकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवन कार्यावर आधारित निबंध स्पर्धाचे लहान, मध्यम व मोठा गटात आयोजन करण्यात आले असून या निबंध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्राचार्य गोर्डे - 8208069252 व सरपंच महेश गायकवाड - 8830315135 याच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आश्वी खुर्द येथे १४ एप्रिल ते १६ मे दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द याच्या विचाराचा जागर केला जाणार असून १४ एप्रिल रोजी सायंकाळी विचार रथाची शोभायात्रा काढली जाणार आहे. यानतंर आश्वी खुर्द येथे आंबेडकर चळवळीचे अभ्यासक प्रा. श्रीकांत माघाडे तसेच माळेवाडी याठिकाणी जीवन भालेराव याचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे.
दरम्यान गावातील सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते १६ मे पर्यत बुध्दाचे तत्वज्ञान व आंबेडकराचे कार्य वाड्या वस्त्यासह घरोघरी जाऊन प्रबोधनाच्रा माध्यमातून लोकानपुढे मांडणार आहेत. या जयंती उत्सवाची सांगता १६ मे रोजी बुध्द जयंती दिनी होणार असल्याची माहिती आयोजकानी दिली आहे.