◻ आश्वी बुद्रुक येथे बालविकास योजने अंतर्गत जिल्हापरिषद शाळेतील ३०० विद्यार्थ्याना खाऊचे वाटप
संगमनेर Live | जगातील विकसीत देशांच्या विकासाचे रहस्य हे त्या देशातील आनंददायी शिक्षणाला जात असते. दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वतंत्र्यापासून शिक्षण क्षेत्रात धोरणात्मक निर्णय न घेण्यात आल्यामुळे याचे गंभीर परिणाम देशाला आगामी काळात सोसावे लागतील. अशी भीती मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जिल्हापरिषद शाळेत अॅड शाळीग्राम होडगर यांच्या संकल्पनेतून बालविकास योजने अंतर्गत आनंदी शिक्षण व बाल आनंद निधी योजना सुरु करण्यात आली असून यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना अँड. होडगर बोलत होते. याप्रसंगी या योजनेतून भगवान महावीर तसेच महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी अँड. होडगर पुढे म्हणाले की, शिक्षणाने समाजाची व कुटुंबाची भरभराट होते. मुलांनवर संस्कार घडतात. संतती हीच खरी संपत्ती असल्याने ती संस्कारक्षम झाल्याने जीवन आनंद दायी बनत असल्याचे म्हटले आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. संजय गांधी होते. जिल्हापरिषद सदस्य अँड. रोहीणीताई निघुते, युवा नेते विजय हिगें, सरपंच महेश गायकवाड, प्रशांत कोळपकर, माधवराव गायकवाड, विनायक बालोटे, सुशील भंडारी, बालविकास योजने व बाल आनंद निधी योजनेचे अध्यक्ष नंदकिशोर कुलथे, सचिव प्रितम गांधी, भाऊराव कांगुणे आदिसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कुटुंबातील आनंद अथवा दु:खद प्रसंगात विशेष करून वाढदिवस, लग्न समारंभ, दशक्रिया विधी, वर्षश्राध्दाचे आदि कार्यक्रमाचे औचित्य साधून यथाशक्ती या निधीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे, सुमतीलाल गांधी, विनायक बालोटे, नानासाहेब डोईफोडे, अशोकराव मांढरे, विनायक जऱ्हाड, सुमतीलाल रातडीया, विजय चतुरे, भाऊसाहेब जऱ्हाड, रोहित भंडारी, अशोक म्हसे या दानदात्यांनी दिलेल्या रकमेतून आश्वी बुद्रुक येथील जिल्हापरिषद मुली व मुलांच्या शाळेत ३०० विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष ताजणे, संतोष भंडारी, जगदीश कांगुणे, योगेश रातडीया, बबन खेमनर, योगेश नाके, निलेश चोपडा, सनी भंडारी, विजय बिहाणी, अनिल कंगणकर, पपलेश लाहोटी यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील भंडारी यांनी केले असून आभार मुख्याध्यापक शिंदे यानी मानले.