◻ शोभा यात्रेने नागरीकाचे वेधले लक्ष
संगमनेर Live (योगेश रातडीया)| ‘अहिंसा हमारा नारा है, मानव धर्म प्यारा है।’ ‘जिओ और जिने दो’ च्या जयघोषात जैन धर्माचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
आश्वी बुद्रुक येथे जैन श्रावक संघाच्या वतीने जैन धर्माचे २४ वे तिर्थकर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती जैन साध्वी मधुर व्याख्यानी प. पु. सम्यकदर्शनाजी माँसा, प. पु. रत्नदर्शनाजी माँसा, प. पु. तेजसदर्शनाजी मॉसा, मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी धर्म स्थानकात ध्वजारोहणानंतर भगवान महावीर व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये बॅन्ड पथक, अहिंसा रथ, पारंपरिक लाल चुंदरीच्या साड्या घातलेल्या महिला तर सफेद वस्त्र परिधान केले पुरुष अशी शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणातील मिरवणुकीत आनंद पाठशाळेच्या मुलांनी विविध प्रबोधनपर कार्यक्रम केल्याने ती लक्षवेधी ठरली.
या मिरवणुकीचा समारोप विठ्ठल मंदिरात झाल्यानंतर मधुर व्याख्यानी प. पु. सम्यकदर्शनाजी मॉसा, प. पु. रत्नदर्शनाजी मॉसा यांचे व्याख्यान झाले. तर अँड. शाळीग्राम होडगर यांनी जैन धर्माचा व भगवान महावीराचे तत्वज्ञान ग्रामस्थांन समोर मांडले. याप्रसंगी अँड. संजय गांधी, अँड. रोहीणीताई निघुते, माधवराव गायकवाड, विनायक बालोटे, नानासाहेब डोईफोडे, भाऊसाहेब जऱ्हाड, ज्ञानेश्वर वाकचौरे, अशोक म्हसे, सत्तारभाई तांबोळी, अशोक जऱ्हाड, केदार बिहाणी, नामदेव होडगर, कैलास बिहाणी, पंडित म्हसे, पंकज कोळपकर, पंकज नाके, बाळकृष्ण होडगर, प्रशांत कोळपकर आदि उपस्थित होते.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहीत भंडारी, नितिन गांधी, अमित भंडारी, विनित गांधी, सनी भंडारी, किरण गांधी, प्रितम गांधी, निलेश रातडीया, सागर रातडीया, यश भंडारी, योगेश लुंकड, राजु लुणीया, राज पटवा, प्रित गांधी, ओम रातडीया, अश्विन मुथ्था, रोशन रातडीया, प्रेम गांधी, सौरभ भंडारी, श्रेणींक बोरा, आनंद चोपडा यांनी परीश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशील भंडारी यांनी केले.
एप्रिल महिन्यात वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मुस्लिम बांधव सत्तारभाई तांबोळी यांनी मिरवणुकीतील सर्वांना गांधी टोपी चे वाटप केले. तसेच अभिजीत बिहाणी यांनी सरबत व सतिश गांधी यांच्या वतीने गौतम प्रसादीचे वाटप करण्यात आले.