संगमनेर Live | आश्वीची भीम जयंती भविष्यात दिशादर्शक ठरणार असून भगवान बुद्ध व बाबासाहेबांचे विचार हे समाजाला कठीण प्रसंगातून तारणारे असल्याने आश्वीतील तरुण कार्यकर्त्यानी प्रदीर्घ असा प्रबोधनाचा कार्यक्रम आखला असून ही घटना गावासाठी अतिशय गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार श्रीकांत माघाडे यांनी काढले.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून श्रीकांत माघाडे बोलत होते.
यावेळी माघाडे पुढे म्हणाले की, महापुरुषांच्या नावाचा केवळ जय-जयकार करण्यापेक्षा त्यांचे अपूर्ण राहिले कार्य पूर्ण करा. बाबासाहेबांच्या तत्वानुसार आश्वीतील तरुण कार्य करत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माघाडे यानी गावातील चिमुकल्यांनी केलेल्या भाषणाला दाद देवून बक्षीसही दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच म्हाळू गायकवाड होते. याप्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व उद्धेश अनिल मुन्तोडे यांनी आपल्या प्रास्तविक भाषणातून करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन मुन्तोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रावसाहेब मुन्तोडे यांनी मानले.
यावेळी कैलास मुन्तोडे व बाळू दरेकर यांनी विशेष सहकार्य केले. एकनाथ मुन्तोडे, पेत्रस मुन्तोडे, बबन मुन्तोडे, रावसाहेब मुन्तोडे, अखिल मुन्तोडे, गौरव मुन्तोडे, प्रमोद मुन्तोडे नामदेव, प्रकाश मुन्तोडे, दिनेश मुन्तोडे, गणेश मुन्तोडे, दत्तराज मुन्तोडे, सुशील मुन्तोडे, दीपक मुन्तोडे, शशिकांत मुन्तोडे व कदम वस्तीतील तरुणांनी विशेष परिश्रम केले. या संपूर्ण कार्यक्रमात आश्वी पोलिस ठाण्याच्या वतीने आनंद मेजर व पाटोळे मेजर व प्रवीण रणधीर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
दरम्यान गावातील सर्व ग्रामस्थ महिला, पुरुष व बालगोपाळ यांनी मिरवणूकी दरम्यान रथावर पुष्पवृष्ठी केली व अभिवादन केले. मिरवणुकीच्या सुरवातीला दिलीप बर्डे व सागर खरात यांनी दोन बुलेट दुचाकीवरून तर शेवटी गणेश मुन्तोडे यांच्या जेसीबीवर लावलेल्या बाबासाहेब व बुद्ध प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. साक्षी व श्रेया मुन्तोडे यांनी मिरवणुकीत रथावर पुष्पवृष्टी केली. याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांच्या नावाच्या जयघोष करण्यात आला.
जयंती दिनी गावातील महिला, मुले सुशिक्षित तरुणांनी पांढरा पोशाख परिधान करून गावातून भव्य अशी सम्यक धम्मरथ यात्रा काढली होती. यावेळी मंगलधून वाजवण्यात येत होती. या रथाचे सारथ्य साधना मुन्तोडे या महिलेने केले. रथामध्ये भगवान बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा व भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. रथाची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. रथावरील भारतीय संविधानाची उद्देशिका सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रथावर तथागत भगवान बुद्धांच्या वैश्विक सत्य तत्वज्ञान इंग्रजी भाषेतून लावण्यात आले होते. या तत्वज्ञानाचा जागर उच्चशिक्षित कार्यकर्ते ३२ दिवस गावातून करणार असल्याचे अनिल मुन्तोडे यांनी सांगितले.