◻ आश्वी खुर्द आरोग्य केंद्रांतील तीन आरोग्य सेवकासह एक डॉक्टर गंभीर जखमी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कोल्हार - संगमनेर महामार्गावरील निमगावजाळी आरोग्य केंद्रासमोर बुधवारी दुपारी भिषण अपाघात झाला. या अपघातात आश्वी परिसरातील ५ व्यक्ती जखमी झाले असून चार दुचाकीसह एका इर्टीका गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी घुलेवाडी आरोग्य केद्रांत आयोजित शिबराला तालुक्यातील आरोग्य केद्रांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे शिबिर संपवून कर्मचारी घरी जाण्यासाठी निघले असताना निमगावजाळी आरोग्य केद्रांच्या प्रवेश दाराजवळ थाबूंन चर्चा करत रस्त्याच्या कडेला उभे होते.
यावेळी नगरकडून भरधाव वेगाने येत असताना अचानकपणे समोर आलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वळालेल्या मारुती इर्टीका गाडीने याठिकाणी उभ्या असलेल्या आश्वी खुर्द आरोग्य केद्रांतील एक डॉक्टर तसेच तीन आरोग्यसेवकासह तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकी उडवून दिल्या. तर दगडी कठडे व लोखंडी फलक तोडून गाडी थेट शेतात गेली. त्यामुळे ५ जण गंभीर जखमी झाले असून वाहणाचे ही प्रचंड नुकसान झाले आहे.
या जखमीमध्ये आश्वी खुर्द आरोग्य केद्रांचे डॉ. हेमंत जोधंळे, आरोग्य सेवक कैलास भुसाळ, आरोग्य सेवक नरेंद्र पोटे, ज्ञानेश्वर ढोकणे असल्याची माहिती स्थानिक नागरीकानी दिली आहे. यावेळी अपघाताची माहिती मिळताच डॉ. लोणे, आरोग्य सेवक चंद्रशेखर, समुदाय आरोग्य अधिकारी सागर गायकवाड यानी घटनास्थळी धाव घेत जखमीवर प्राथमिक उपचार केले.
दरम्यान याप्रसंगी घटनास्थळी पोलीस पाटील दिलिप डेगंळे, पोलीस हवालदार दिपक बर्डे, रवीद्रं भाग्यवान, साठे, नर्हे यानी स्थानिकाच्या मदतीने जखमीना पुढील उपचारासाठी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली आहे.