◻ मातब्बराची प्रतिष्ठा पणाला लागणार ; बिनविरोधाची परंपरा यदां ही होणार खंडीत.?
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल दूध उत्पादक शेतकऱ्याची कामधेनु असलेल्या आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल वाजला असून १७ जागासाठी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी ३१ उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. तर एक जागा बिनविरोध झाल्याने १६ जागासाठी चुरशीची निवडूक होण्याची चिन्ह आहेत.
आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्था ही गावासह परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्याची कामधेनू म्हणून ओळखली जाते. संस्था दूध उत्पादकाच्या विश्वासास पात्र ठरल्यामुळे संस्थेस दैनंदिन ४ हजार लीटर दूधाचा पुरवठा होत असून संस्थेचे ४०० सभासद आहेत. वेळोवेळी संस्थेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या सभासदाच्या सुखा - दु:खात सहभागी होणाऱ्या संचालकाच्या पाठीशी सदैव संस्थेचे सभासद उभे राहत आले आहेत.
त्यामुळे १९८८ साली स्थापन झालेली ही संस्था ३० वर्ष सभासदाच्या पाठीमुळे बिनविरोध राहिली होती. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने ही परंपरां खंडीत झाली. तर यावेळी १७ संदस्य पदाच्या जागासाठी तब्बल ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या निवडणूकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून विजय विठ्ठल गायकवाड, निलेश बाळासाहेब भवर, अनिल गोपीनाथ शिदें, अशोक शंकर भोसले, मकरंद दिनकर गुणे, रमेश सुर्यभान सिनारे, नानासाहेब विठ्ठल गायकवाड, दिलीप सुखदेव मांढरे, कैलास तुकाराम गायकवाड, विजय माधव भोसले, विठ्ठल गणपत भोसले, राजेद्रं पाटीलबा गायकवाड, संपत कारभारी गायकवाड, सुधाकर प्रभाकर शिदें, अनिल काशिनाथ सोनवणे, बापूसाहेब बबन गायकवाड, विठ्ठल बजाबा गायकवाड, विठ्ठल मुरलीधर मांढरे, अविनाश साहेबराव सोनवणे, नामदेव किसन शिदें, देवराम लक्ष्मण मांढरे या २१ जणानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अमोल एकनाथ मुन्तोडे, संजय येडुजी मोरे, तर महिला प्रवर्गातून हिराबाई कारभारी शिदें, पद्मा बाळकृष्ण शिदें, मीराबाई संपत गायकवाड, रुपाली शैलेश गडकरी, इतर मागास प्रवर्गातून रामनाथ दामोधर क्षीरसागर, कैलास तुकाराम गायकवाड, अनिल गोपीनाथ शिदें असे ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून दिलीप निवृत्ती वाल्हेकर याचा ३१ वा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याने ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान ४ मे रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अतिम मुदत असून १५ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने सभासदासह ग्रामस्थाचे ही या अर्ज माघारीच्या दिवसाकडे लक्ष लागले आहे.